गूगलने काही महिन्यांपूर्वी मोशन स्टील्स नावाचं 3 सेकंदाचे व्हिडिओ काढणारं अॅप सादर केलं होतं. आता त्या अॅपमध्ये AR (ऑगमेंटेड रिअॅलिटी ) मोड उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे अॅपमधील एआर स्टीकर्स वापरुन आपण GIF किंवा छोटा व्हिडिओ बनवून तो रेकॉर्ड करू शकतो!
AR Augmented Reality म्हणजे आभासी आणि वास्तविक जग दोन्हीचा एकाच वेळी वापर करता येतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये फक्त आभासी जगच पाहता येतं. ऑगमेंटेड रिअॅलिटी मध्ये मात्र आभासी जगातील वस्तू वास्तविक जगात दिसतात (कॅमेरा/डिस्प्ले/हेडसेटद्वारे).
मोशन स्टील्स डाउनलोड लिंक : Motion Stills on Google Play
search terms AR in marathi motion stills google stickers