पतंजलीकडून आज सकाळीच किंभो मेसेंजर अॅप सादर करण्यात आलं होतं. या संबंधी प्रेस रिलीज (माध्यमांसाठी) करण्यात आला. ‘व्हॉटसअॅपला आता स्वदेशी पर्याय’ अशा आशयाच्या बातम्या देखील प्रसिद्धीस आल्या. मात्र काही तासात या अॅपमधील सुरक्षेसंदर्भात त्रुटी उघड झाल्याने आता हे अॅप प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आलं आहे!
स्वदेशी पर्याय देण्याच्या घाई घाईत यूजर्सच्या सुरक्षेवर गोपनीयतेवर काहीच लक्ष न दिल्याचं भारतात नेहमी दिसून येतं. त्याचं ताजं उदाहरण किंभो अॅप. याच नाव संस्कृत शब्दांवरून ठेवण्यात आलं आहे. (किम व भो)
हे अॅप प्रसिद्ध झाल्यावर नेहमीप्रमाणे माध्यमे लगेच गाजावाजा करू लागली मात्र काही जणांच्या जागरूक नजरेने या अॅप मधील सुरक्षेबाबतीत असलेल्या त्रुटी शोधल्या.
यामध्ये आधार माहिती लीक प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एलिएट अल्डरसन नावाने ट्विटरवर असलेल्या फ्रेंच एथिकल हॅकर (खरं नाव रॉबर्ट बाप्टीस्ट) याने देखील याबाबत ट्विट केलं. मग यूजरचा डेटाबेस आणि सोबत सर्वांचे पाठवलेले संदेश सुद्धा त्यांना पाहता येत होते!
काही इतर ट्विटरवर बोलो (Bolo) ह्या अॅपची कॉपी असल्याचं निदर्शनास आणून दिलं. प्ले स्टोरवर असलेलं हे अॅप अगदी स्क्रिन शॉट डिस्क्रिप्शनसह कॉपी करण्यात आलं आहे! आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळासाठी स्क्रीनशॉटमध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीचं छायाचित्र असल्याचंसुद्धा दिसून येत होतं. (जे अर्थात बदलण्यात आलं) नंतर काही काळातच हे किंभो अॅप प्ले स्टोर वरून काढण्यात आलं आहे…!
मराठीटेककडून असं आवाहन करतो कि फक्त नावात इंडियन, भारतीय आहे म्हणून कुठलंही अॅप कधीच इन्स्टॉल करू नका.सुरक्षित असल्याची खात्री करा मगच इन्स्टॉल करा. प्ले स्टोरवरील सर्वच अॅप सुरक्षित नसतात!
एलिएट अल्डरसनच्या काही ट्विट्स :
This @KimbhoApp is a joke, next time before making press statements, hire competent developers… If it is not clear, for the moment don’t install this app. #Kimbho #KimbhoApp pic.twitter.com/wLWzO6lhSR— Elliot Alderson (@fs0c131y) May 30, 2018
Ok, I will stop here. The #Kimbho #android #app is a security disaster. I can access the messages of all the users…🤦♂️— Elliot Alderson (@fs0c131y) May 30, 2018
search terms kimbho ramdevbaba patanjali
Patanjali sucks. Kimbho was failure from start. Asked permission for everything …!