होय आता तुमच्या फोनवरून पाठवत असलेले संदेश जे सध्या नेहमीच्या मेसेजिंग अॅप मधून पाठवता ते कम्प्युटरवरून सुद्धा पाठवता येतील! हल्ली व्हॉटसअॅप सारख्या मेसेजिंग सेवांमुळे एसएमएसचा वापर कमी झाला असला तरी महत्वाचे संदेश, कंपन्यांचे संदेश एसएमएस द्वारेच पाठवले जातात. आता हेच संदेश आपण आपल्याला आपल्या फोन क्रमांकावर येताच आपल्या कम्प्युटर (डेस्कटॉप/लॅपटॉप) वर सुद्धा पाहू शकतो आणि तेथूनच रिप्लायसुद्धा देऊ शकतो!
गूगल सध्या रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) या अधिक सुधारित मेसेजिंग साठी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच GIF फाइल पाठवणे, स्मार्ट रिप्लाय, लिंक प्रिव्हयू अशा सोयी सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यासाठी तुमच्याकडे गूगलचं मेसेजिंग अॅप असायला हवं (काही फोन्समध्ये आधीपासूनच असेल नसेल तर प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता लिंक : Android Messages on Google Play
त्यानंतर डेस्कटॉपवर क्रोम/ इतर ब्राऊजरमध्ये खालील प्रमाणे कृती करा आणि तुमच्या फोन व कम्प्युटर मध्ये सर्व मेसेज sync होतील…!
अधिकृत माहिती : Android Messages on Web
search terms android messages web how to use view reply phone messages in computer desktop laptop