अॅमॅझॉन इंडियाने त्यांच्या प्राईम सेवेमध्ये प्रथमच मासिक तत्वावर वर्गणी/मेंबरशिप घेता येईल अशी सोय दिली आहे. आता मासिक किंवा वार्षिक असे दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. वार्षिक मेंबरशिप ₹९९९ तर मासिक मेंबरशिप ₹१२९ मध्ये घेता येईल. (जी १२ महिन्यांसाठी दीडपट म्हणजे ₹१५४८ पडते!)
प्राईम सेवेमध्ये प्रामुख्याने वस्तूंची मोफत डिलेव्हरी असते ज्यामुळे वस्तू कितीही किंमतीची असली तरीही अॅमॅझॉन ती मोफत घरपोच करेल. यासोबत प्राईम व्हिडीओ ही सेवा ज्याद्वारे विविध चित्रपट आणि मालिका पाहता येतात आणि तसेच प्राईम म्यूझिक ही गाण्यांसाठीची सुविधा देण्यात येते. सोबत अॅमॅझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल किंवा तशा प्रकारच्या खास डिस्काउंट सेल वेळी प्राईम यूजर्सना प्रथम संधी देण्यात येते..!
प्राईम सेवा सुरु करण्यासाठी लिंक : https://amzn.to/2MX9iue
search terms amazon prime monthly plans launched in india
ADVERTISEMENT