वनप्लसने मॅक्लारेन या सुपरकार कंपनी सोबत भागीदारी करून 6T या फोनची खास आवृत्ती सादर केली आहे. बाकी बाबतीत हा फोन सारखाच असला तरी मॅक्लारेनमधील काही डिझाईन, चार्जिंगसाठी नवी पद्धत आणि 10GB रॅम देण्यात आली आहे!
बॉक्समध्येही सर्व गोष्टींवर केशरी रंग पाहायला मिळतोय. अगदी चार्जिंग केबलसुद्धा केशरीच आहे! नवीन वार्प चार्ज तंत्रज्ञान देण्यात आलं असून यामुळे नेहमीच्या ३० मिनिटांच्या चार्जमध्ये पूर्ण दिवस पुरेल एव्हढी बॅटरी ऐवजी Warp Charge 30 द्वारे २० मिनिटांच्या चार्जवर पूर्ण दिवस पुरेल एव्हढ चार्जिंग होईल असं वनप्लस सांगत आहे! यामध्ये वापरण्यात आलेलं कार्बन फायबर मॅक्लारेन कारमध्ये वापरण्यात येतं!
OnePlus 6T McLaren Edition Specs :
डिस्प्ले : 6.41″ Optic AMOLED 2340x1080p, 19.5:9 aspect ratio, Gorilla Glass 6
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
रॅम : 10GB LPDDR4X
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 16MP+20MP f/1.7 with OIS and EIS
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS
बॅटरी : 3,700mAh with 30W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : OxygenOS based on Android 9 Pie
इतर : 802.11 a/b/g/n/ac 2x2MIMO dual band Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB 2.0 Type-C
सेन्सर्स : In-display fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : £649 = ~५९००० (लवकरच भारतीय किंमत सांगण्यात येईल)