फेसबुक पुन्हा एकदा बगला (त्रुटी) बळी पडलं असून यामुळे तब्बल ६८ लाख वापरकर्त्यांचे खासगी फोटो डेव्हलपर्स परवानगी शिवाय पाहू शकत होते जे त्यांनी सेटिंग्जनुसार पाहणं अपेक्षित नाहीय! या डेव्हलपर्सच्या अॅप्सना मर्यादित फोटो पाहण्याचीच परवानगी असताना या बगमुळे त्यांना युजर्सचे प्रायव्हेट फोटो सुद्धा पाहता येत असल्याचं उघड झालं आहे! यामध्ये स्टोरीजमधील फोटोंसोबत सोबत युजर्सनी अपलोड केलेले मात्र कधीही पोस्ट न केलेले फोटोसुद्धा उघड झाले आहेत यावरून हा बग कुठवर नुकसान करत होता याची कल्पना येईल…
२०१८ वर्ष युजर्सच्या प्रायव्हसीसाठी सर्वात वाईट वर्ष ठरलं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये जवळपास सर्वचज मोठ्या साईट्सना कोणत्यातरी सेवेत हॅकला सामोरं जावं लागलं आहे!
१२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान हे फोटो उघड होण्याची घटना घडली आहे. फेसबुकला याविषयी २५ तारखेला माहिती मिळाली मात्र त्यांनी आजपर्यंत हे उघड केलं नाही! भरीस भर त्याच दरम्यान फेसबुकवरच आणखी एक बग सापडला होता!
ज्या युजर्सचे फोटोज उघड झाले होते त्यांना नोटिफिकेशन दिसेल कि photos may have been exposed… फेसबुक आता सांगत आहे कि याद्वारे उघड झालेले फोटो डेव्हलपर्सना डिलीट करण्यास आवाहन करत आहोत पण आता हे किती उपयोगी ठरणार हा वेगळाच प्रश्न आहे! ८७६ देशांतील जवळपास १५०० अॅप्सना हा परवानगी नसताना ऍक्सेस मिळाला होता!
अधिक माहिती Important information about your photos on Facebook