अॅमेझॉनने मंगळवारी त्यांच्या अलेक्सा या प्रसिद्ध व्हॉईस असिस्टंटमध्ये नव्या सोयी जोडल्या असून ज्यामुळे आता भारतीय भाषा बोलून सुद्धा आपण अलेक्साला आज्ञा देऊ शकतो! या नव्या स्किलचं नाव Cleo असं आहे ज्याद्वारे मराठी, तामिळ, कन्नड, बेंगाली, तेलुगू, गुजराती, हिंदी या भाषांमध्ये उपलब्ध होत आहे!
काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनने अलेक्साला नव्या भाषा शिकवण्यासाठी हे स्किल अमेरिकेत सादर केलं होतं त्यानंतर जर्मन, जापनीज, फ्रेंच भाषा सुद्धा शिकवल्या जात आहेत. कुठल्या प्रकारच्या असिस्टंटला आधी ती भाषा बोलण्यासाठी AI द्वारे मदत केली जाते.
या स्किल दरम्यान किमान पाच गोष्टी आपल्या भाषेत बोलण्यासाठी सांगण्यात येईल. अलेक्सा काही ठराविक किंवा कुठल्याही गोष्टीवर बोलण्यास सांगू शकते. यामुळे आपण बोलत असलेल्या भाषेबद्दल माहिती गोळा करण्यास अलेक्साला मदत होते आणि मग लवकरच ती त्या भाषेत बोलू शकते! जितका जास्त डेटा अभ्यासण्यासाठी मिळेल तितक्या लवकर ती भाषा शिकेल!
भारतीय भाषांमध्ये Cleo स्किल उपलब्ध झाल्यामुळे अलेक्सा आता हळूहळू भारतीय भाषा शिकून आपल्याशी आपल्या भाषांमध्ये संवाद साधेल! हे स्किल अॅमेझॉनच्या Echo (एको) उत्पादनांवर तसेच स्मार्टफोन अॅपमध्येसुद्धा उपलब्ध आहेत. अलेक्सा अॅपमधील स्किल विभागात Cleo पर्याय सुरु करा किंवा तुमच्याकडे अॅमेझॉनच्या Echo असेल तर Enable Cleo अशी आज्ञा देऊ शकता.
अॅमेझॉनच्या एको स्मार्ट उपकरणे : Amazon Echo Products
अलेक्सा अॅप Amazon Alexa on Google Play
अलेक्सा अॅप Amazon Alexa on iTunes
search terms amazon alexa Indian languages cleo skill marathi