शायोमीने आज नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात POCO(पोको) हा त्यांचा नवीन उप-ब्रँड आणि त्याअंतर्गत पोको F1 हा स्मार्टफोन सादर केला आहे. पोकोद्वारे पूर्णपणे नव्याने प्रॉडक्ट तयार करून शायोमीच्या रिसोर्सेसद्वारे विक्रीचा मानस आहे. पोको अंतर्गत परफॉर्मन्सवर भर देऊन स्मार्टफोन लाँच केले जातील असे पोको तर्फे सांगण्यात आले आहे. तर पोको F1 चे मास्टर ऑफ स्पीड असे घोषवाक्य असेल.
पोको F1 मध्ये लिक्विड कूल टेक्नॉलॉजीचा समावेश आहे यामुळे जास्त वेळ चांगला परफॉर्मन्स मिळेल. यासोबतच क्विक चार्ज ३.०, 4G+ द्वारे चांगला कव्हरेज आणि नेटवर्क, इन्फ्रारेड फेस अनलॉक, Real-time AI फोटोग्राफी, सर्वोत्तम प्रोसेसर अशा सुविधा असतील.
पोको F1 फ्लिपकार्ट exclusive असून Mi.com वर सुद्धा २९ ऑगस्ट, 12 PM पासून उपलब्ध होईल. पोको F1 हा सुद्धा मेड इन इंडिया असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
POCO F1 | The #MasterOfSpeed https://youtu.be/9FqpI1LJvDw
POCO F1 Specifications
डिस्प्ले : 6.18 inch (2160х1080) FHD+ 18.7:9 Display with Notch
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845 (Octa Core 2.8GHz)
रॅम : 6/8GB LPDDR4X RAM
स्टोरेज : 64/128/256GB (UFS 2.1 Storage)(Expandable Upto 256GB)
बॅटरी : 4000 mAh Battery with Quick Charge 3.0
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI for POCO (Android Oreo 8.1 आधारीत )
कॅमेरा : 13MP + 5MP Sony (IMX 363 sensor + Samsung Sensor)
फ्रंट कॅमेरा : 20MP (f/2.0)
रंग : Graphite Black, Steel Blue, Rosso Red, Armoured Edition
सेन्सर : Fingerprint Reader (On the Back), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope
इतर : USB Type-C, Dual Sim Slot (Hybrid ), 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, 2.5 D Corning Gorilla Glass, Polycarbonate Back
किंमत – ₹20,999 (6+64GB)
₹23,999 (6+128GB)
₹28,999(8+256GB)
₹29,999 Armoured Edition (8+256GB)
लिंक – Poco F1 on Flipkart
याबरोबरच HDFC बँकेतर्फे १००० डिस्काउंट, जिओ तर्फे ऑफर असतील.