Minecraft या प्रचंड लोकप्रिय असलेल्या गेमच्या मोबाइल आवृत्तीची किंमत भारतात Google Play Store आणि Apple App Store या दोन्हींवर मोठ्या प्रमाणात किमतीत कमी करण्यात आली आहे. हा लोकप्रिय गेम Android आणि iPhone साठी ॲप स्टोअरवर २९ रुपयात डाउनलोड करता येईल. एरवी या गेमची किंमत ६०० ते ६५० इतकी असते!
Download Minecraft on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.mojang.minecraftpe
Download Minecraft on Apple App Store : https://apps.apple.com/in/app/minecraft/id479516143
Minecraft ही गेली अनेक वर्षं जगभरात करोडो गेमर्सची आवडती गेम असून २०११ मध्ये सादर झालेली ही गेम आत्तासुद्धा गेम स्ट्रीमर्समध्ये नेहमी पहिल्या स्थानावर असते. शिवाय आजवर जगभरात सर्वाधिक विक्री झालेली गेम असा विक्रमसुद्धा याच गेमच्या नावावर आहे. या गेमची फोन आवृत्ती जी आधी Pocket Edition म्हणून ओळखली जायची ती आता अँड्रॉइड व iOS वर फक्त २९ रुपयात आणि ती सुद्धा फक्त भारतातच एव्हढया कमी किंमतीत मिळत आहे.
जर तुम्ही अनेक दिवसांनी किंवा प्रथमच गूगल प्ले वर App विकत घेत असाल तर तुम्हाला तिथे २० रु चं कुपन सुद्धा मिळेल ज्यामुळे ही गेम फक्त ९ रुपयात विकत घेऊ शकता. मात्र ही ऑफर सर्वांसाठी लागू नसेल.