वनप्लस कंपनीने आज त्यांचा पहिला Foldable म्हणजेच घडी घालता येईल असा फोन सादर केला असून त्याचं नाव त्यांनी OnePlus Open असं ठेवलं आहे. पहिलाच फोन असला तरीही यामधील फीचर्स एकदम प्रीमियम असून याची स्पर्धा थेट सॅमसंगच्या Galaxy Z Fold5 सोबत असेल. फीचर्सबाबत कोणतीही कसर न ठेवता त्यांनी हा फोन आणण्याचा प्रयत्न केला आहे.
फोनमध्ये Snapdragon™ 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB रॅम, 512GB स्टोरेज, बाहेर 6.31″ आणि घडी उघडल्यावर आतली 7.82″ स्क्रीन मिळेल. डिस्प्लेमध्ये 2800nits ब्राइटनेस असून या फोनवर ४ वर्षं अँड्रॉइड अपडेट्स आणि ५ वर्षं सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.
या फोनची भारतातली किंमत १,३९,९९९ इतकी असून ICICI कार्ड धारकांना ५००० अतिरिक्त सूट मिळेल. आजपासून प्रिऑर्डरसाठी उपलब्ध झाला असून २७ ऑक्टोबरपासून खरेदी करता येईल.
Main डिस्प्ले : 7.82″ FlexiFluid AMOLED LTPO 3.0 120Hz 2800nits
Cover डिस्प्ले : 6.31″ Super Fluid AMOLED LTPO 3.0
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 8 Gen 2
रॅम : 16GB
स्टोरेज : 512GB UFS 4.0
कॅमेरा : 48MP Main (Sony LYT-T808)+ 64MP Telephoto (OmniVision OV64B) + 48MP Ultrawide (Sony IMX581)
फ्रंट कॅमेरा Main Display : 20MP
फ्रंट कॅमेरा Cover Display : 32MP
बॅटरी : 4,805 mAh 67W SuperVooc Charging
ऑपरेटिंग सिस्टम : OxygenOS 13.2 based on Android™ 13
इतर : Side fingerprint scanner, 5G, Bluetooth 5.3, NFC, Wi-Fi 6E/7, IP68 water resistance, eSIM, Dolby Atmos, HDR10/HDR10+
रंग : Emerald Dusk and Voyager Black
किंमत : 16GB+512GB ₹1,39,999
फोनच्या खरेदीवर १५००० किंमतीचे पार्टनर ऑफर्स मिळणार असून यामध्ये Jio Plus, Google One, YouTube Premium आणि Microsoft 365 सहा महिने मिळेल.