इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून सुरू असलेल्या गोंधळ पाहता त्यापासून त्रस्त युजर्सना तशाच प्रकारचं ॲप उपलब्ध करून देण्यासाठी मार्क झकरबर्गच्या मेटाने Threads (थ्रेड्स) नावाचं टेक्स्ट आधारित ॲप आजपासून उपलब्ध करून दिलं आहे. Threads म्हणजे रियलटाइम अपडेट्स आणि सार्वजनिक संभाषणांसाठी नवीन, स्वतंत्र जागा असल्याचं इंस्टाग्रामतर्फे सांगण्यात आलं आहे.
अवघ्या चार तासात ५० लाखांहून अधिक युजर्सनी हे नवं ॲप वापरण्यास सुरुवात केली! जसं इंस्टाग्राम फोटोज आणि आता रील्सवर आधारित माध्यम बनलं आहे तसं हे नवं थ्रेड्स ट्विटरसारखं टेक्स्ट आधारित असणार आहे.
Download Threads App : https://www.threads.net
हे ॲप वरील लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता. Sign Up करण्यासाठी तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट वापरता येईल. तुमचं जुनं Username इकडेसुद्धा येईल.
- Threads हे एक टेक्स्ट आधारित पोस्ट्स करण्याचं माध्यम आहे.
- तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटनेच लॉगिन करता येईल.
- 500 कॅरक्टर्स असलेल्या पोस्ट्स करू शकता. लिंक्स, फोटोज आणि 5 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ टाकू शकता.
- Interoperable Social Networks मध्ये सहभागी होणार!
यानिमित्ताने मेटा (फेसबुक) संस्थापक मार्क झकरबर्गने तब्बल ११ वर्षानी प्रथमच खालील ट्विट केलं आहे. यामध्ये प्रसिद्ध स्पायडरमॅन मीम पोस्ट केली आहे.
आता या ॲपला किती प्रतिसाद मिळतो आणि ट्विटरसमोर याचं आव्हान किती प्रमाणात उभं राहील हे नंतर कळेल पण सध्याचं वातावरण पाहता थ्रेड्स फार लोकप्रिय होईल असं वाटत नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप अशी सर्व माध्यमं एकाच कंपनीकडे असताना आणखी एका ॲपद्वारे त्यांच्याच कडे पोस्ट करत राहण्याला आणि डेटा शेयर करण्यात किती युजर्स उत्सुक असतील हा प्रश्न आहे.
nice 👍