मेटा या कंपनीने (इंस्टाग्राम आणि फेसबुक यांची मालकी असलेली कंपनी) त्यांच्या युजर्ससाठी ट्विटरप्रमाणे दरमहा पैसे देऊन ब्ल्यु टिक मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या सेवेला त्यांनी Meta Verified असं नाव दिलं आहे. ही सेवा आता भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
iOS वर अॅप स्टोर व अँड्रॉईडवर प्ले स्टोरमार्फत पैसे देण्याचा पर्याय असून यासाठी तुम्हाला दरमहा ६९९ रुपये मोजावे लागतील. याद्वारे फेसबुक व इंस्टाग्राम दोन्हीकडे ब्ल्यु टिक मिळेल. भविष्यात वेबसाइटद्वारे पैसे देण्याचाही पर्याय मिळणार असून त्यामध्ये अॅप स्टोरची चार्जेस नसल्यामुळे ५९९ रुपये दरमहा असा प्लॅन असेल.
- उजव्या कोपऱ्यात खाली तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा
- आता उजव्या कोपऱ्यात वर तीन आडव्या रेषा असतील त्यावर टॅप करा
- आता Meta Verified हा पर्याय निवडा
- आता Subscribe
- मग Pay Now
- आता तुमच्या App Store/Play Store मध्ये पेमेंटसाठी पर्याय निवडून सेटप करा.
- आता Get Meta Verified
- Take a photo of your ID
Meta Verified चे घेण्याचे फायदे
- Verified Badge म्हणजेच ब्ल्यु टिक
- अधिक अकाऊंट सुरक्षा
- गरज पडेल तेव्हा सपोर्ट टीमसोबत बोलता येणार
- खास स्टीकर्स जे फक्त Meta Verified युजर्सना मिळतील!
मेटाने अकाऊंट verify करण्यासाठी खालीलप्रमाणे काही नियम सांगितले आहेत.
- तुमचं अकाऊंट यामार्फत verify करून घेण्यासाठी तुम्हाला सरकारी आयडी प्रूफ द्यावं लागेल. उदा. आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसन्स, इ.
- तुमचं अकाऊंटचं नाव आणि सरकारी आयडीवरील नाव आहे जुळायला हवं
- तुमचं वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावं
- तुम्ही आधी केलेल्या पोस्ट्ससुद्धा यासाठी तपासल्या जाऊ शकतात.
- तुमच्या अकाऊंटवरून पूर्वी कोणतेही गैरप्रकार केलेला नसावा