अडोबी (Adobe) ने त्यांच्या लोकप्रिय फॉटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये नवी Generative Fill ची सोय आणली आहे. याद्वारे काही शब्द लिहून क्लिक केल्यास कोणत्याही फोटोमध्ये हवे तसे बदल करता येतील! ही सोय सध्या चाचणी आवृत्तीत असून लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे!
Adobe Firefly हे या कंपनीचं generative AI engine असून याच्या मदतीनेच फॉटोशॉप आता हे Generative टूल वापरू शकेल. कोणत्याही इमेजचा आपल्याला हवा तेव्हढा आकार वाढवणे, कल्पना होईल ती वस्तू जोडणे, काही मोजक्या शब्दांच्या इनपुटवर एका क्लिकने इमेजमध्ये बदल करणे शक्य होणार आहे.
अर्थात यामुळे AI आधारित टूल्सबद्दल व्यक्त होत असलेली भीती आणखी वाढतच जाईल. असं तंत्रज्ञान कोणत्याही व्यक्तीच्या हातात सहज उपलब्ध होत असल्यामुळे गैरप्रकरांमध्ये नक्कीच वाढ होईल आणि येत्या काही दिवसात हे दिसून येईलच…