स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध ब्रँड वनप्लस आता टीव्ही बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. कंपनीचे सीइओ पीट लाउ (Pete Lau) यांनी वनप्लस ऑनलाईन फोरमवर आज याबद्दल घोषणा केली. २०१३ मध्ये सादर झालेल्या वनप्लसने काही वर्षांतच गुणवत्ता तसेच फ्लॅगशिपच्या तुलनेत वाजवी किंमतीच्या जोरावर मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. मागील पाच वर्षांत वनप्लसने ८ फ्लॅगशिप सादर केले असून वनप्लसच्या ऑक्सिजन OS चा सुद्धा मोठा चाहता वर्ग आहे. वनप्लस भारतातील प्रीमियम फोन्सच्या मार्केटमध्ये सर्वात पुढे आहे. अलीकडे बऱ्याच फोन कंपन्या टीव्हीच्या क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी शायोमीने सुद्धा टीव्ही सादर केले होते जे अजूनही लोकप्रिय आहेत.
Excited to take the next step forward together! What would you like to see in the OnePlus TV? Have ideas for a name? ✍️Let us know here: https://t.co/IpSnDtPxkT— Pete Lau (@petelau2007) September 17, 2018
घर, ऑफिस त्याचबरोबर ऑफिससाठीचा प्रवास या सर्वांमध्ये घरामधील करमणुकीचा अनुभव हा सुद्धा एका महत्वाचा भाग असून 5G आणि AI सोबत वनप्लसच्या डिझाईन, इमेज क्वालिटी, ऑडिओमधील अनुभवाच्या जोरावर आणखी चांगला अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठीच वनप्लस टीव्ही तयार करण्यात येणार असल्याचे सीईओनी सांगितलं आहे.
वनप्लस TV ग्राहकांसाठी केव्हा लाँच केला जाईल तसेच स्पेसिफिकेशन्स व इतर गोष्टींबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. वनप्लसच्या मते फक्त आवडते शो पाहण्यासोबतच तुमच्या टीव्हीमध्ये बरेच काही करण्याची क्षमता असावी. १९६ देशांमध्ये जवळपास ५० लाख वनप्लस कॉम्युनिटी मेंबर्स आहेत. काही आठवड्यात वनप्लसचा पुढील स्मार्टफोन OnePlus 6T सुद्धा येतोय!
अधिकृत घोषणा Intelligent Connectivity: Our Next Step Forward