मागील वर्षी गूगल तर्फे सादर करण्यात आलेले फॅमिली लिंक फॉर पेरेंट्स अॅप आता भारतात उपलब्ध झाले आहे. मुलांना मोबाईल किती वेळ वापरता येईल, कोणते ॲप इन्स्टॉल करता येतील त्याचबरोबर आपल्या पाल्याचा मोबाईल झोपण्याच्या वेळे दरम्यान लॉक करणे, मोबाईल वापरासाठी ठराविक वेळेचे बंधन लावणे यांसारख्या सुविधांचा यामध्ये समावेश आहे. मोबाईलचे लोकेशन तसेच मुलांनी कोणत्या अॅपवर किती वेळ घालवला आहे अशा गोष्टी सुद्धा याद्वारे समजणार आहेत.
प्रथम पुढील लिंक वरून आपणास फॅमिली लिंक फोर पेरेंट्स हे ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर साइन अप करताना जर आपल्या पाल्याचे गूगल अकाउंट नसेल तर ते उघडावे लागेल. अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही स्टेप्स पार पाडाव्या लागतील व यानंतर फॅमिली लिंक आपोआपच पाल्याच्या मोबाईलवर डाऊनलोड केले जाईल. फॅमिली लिंक ॲप वापरण्यासाठी पाल्याच्या मोबाईलमध्ये नुगट व त्यापुढील अँड्रॉइड व्हर्जन असणे आवश्यक आहे. तसेच लॉलीपॉप व मार्शमेलो व्हर्जनवर वापरण्यासाठी हेल्प सेंटर मधील माहिती पाहू शकता.
फॅमिली लिंक ॲपच्या माध्यमातून खालील गोष्टी करता येतील :-
- स्क्रीन टाईम त्याचबरोबर बेडटाइमची वेळ ठरवणे.
- आपल्याकडील ॲपच्या माध्यमातून डिवाइस लॉक करणे.
- पाल्याचे लोकेशन जाणून घेणे.
- ऍक्टिव्हिटी रिपोर्ट पाहणे यामध्ये आवडत्या अॅपवर किती वेळ गेला आहे हे समजेल.
- एखादे ॲप डाऊनलोड करण्यासाठी अनुमती देणे किंवा नको असलेले ब्लॉक करणे.
- एखादे शैक्षणिक ॲप सुचवणे
टेक्नॉलॉजीचा योग्य वापर पाल्यांकडून व्हावा त्याचबरोबर अतिवापर सुद्धा होऊ नये यासाठी अनेक पालक आग्रही असतात त्यासाठीच आम्ही फॅमिली लिंक हे ॲप सादर केले आहे जेणेकरून मुलांनी टेक्नॉलॉजीचा वापर करताना त्यावर नियंत्रण सुद्धा ठेवता येईल असे गुगल तर्फे सांगण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून पूर्णपणे नियंत्रण ठेवता येत नसले तरीसुद्धा काही कारणास्तव मुलांना द्याव्या लागणाऱ्या मोबाइल वापरावरील नियंत्रणासाठी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भारतासोबतच इतर अनेक देशांत सुद्धा हे अॅप उपलब्ध असेल.
फॅमिली लिंक बद्दल आणखी माहितीसाठी – https://families.google.com/familylink/