रिलायन्स जिओच्या स्वस्त इंटरनेटमुळे ग्राहकांना स्पर्धेच्या रूपात बराच फायदा झाला. त्यानंतर जिओने त्यावरच न थांबता कंटेंटच्या दृष्टीने सुद्धा मोठे प्रयत्न केले असून जिओ प्राईम ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ म्युझिक सारख्या अनेक सोयी चक्क मोफत मिळतात. आता याच Jio TV अॅपवर ग्राहक येत्या पाच वर्षात होणारे सर्व क्रिकेट सामने मोफत पाहता येणार आहेत! याबाबत स्टार इंडियासोबत त्यांचा नुकताच करार झाला असून T20, एकदिवसीय, कसोटी सामने जिओ टीव्हीवर उपलब्ध होणार आहेत! हे सामने अर्थातच हॉटस्टारवर सुद्धा प्रसारित होतीलच
जिओ टीव्हीवर हे सामने पाहण्यासाठी ग्राहकांना प्लॅन सुरु असलेलं जिओ सिम लागेल याशिवाय काहीही शुल्क न देता सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येतील! जिओ प्राईमची नोंदणी जी अजूनही मोफतच असल्यासारखी सुरु आहे त्याद्वारे हे सामने दाखवले जाणार आहेत.
जिओ टीव्ही अॅप अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. जुलै महिन्यात जिओ सर्वाधिक वापरकर्त्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.