आज ॲपलने त्यांच्या Far Out कार्यक्रमात त्यांची नवी उत्पादने सादर केली असून यामध्ये आयफोन १४ मालिका, वॉच सिरीज ८, वॉच SE, नवं वॉच अल्ट्रा आणि नवे एयरपॉड्स प्रो सादर केले आहेत. आयफोनच्या प्रो मॉडेल्समधील नॉच कमी करून आता त्याजागी गोळीच्या आकाराने घेतली आहे ज्याला ॲपलने Dynamic Island असं नाव सुद्धा दिलं आहे!
आयफोन १४ फोन्समध्ये आपत्कालीन वेळी वायफाय/नेटवर्क नसतानादेखील थेट उपग्रहांसोबत जोडले जाऊन मदत मागण्याची Emergency SOS Via Satellite सोय देण्यात आली आहे!
नव्या आयफोन्समध्ये ॲपलने सिम कार्ड पूर्णपणे काढून टाकलं असून आता केवळ eSIM चाच पर्याय दिला आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयफोन मधील सिम काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकायचं असेल तर तसं करता येणार नाही. शिवाय यावेळी Type C पोर्ट देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र यावेळीही ॲपलने Lightning Port च दिलं आहे!
भारतीय किंमती खालील प्रमाणे (Apple iPhone 14 Indian Pricing)
- Apple iPhone 14 : ₹79,900
- Apple iPhone 14 Plus : ₹89,900
- Apple iPhone 14 Pro : ₹1,29,900
- Apple iPhone 14 Pro Max : ₹1,39,900
- Apple Watch SE : ₹29,900
- Apple Watch Series 8 : ₹45,900
- Apple Watch Ultra : ₹89,900
- Apple AirPods Pro : ₹26,900
आयफोनच्या नव्या Apple iPhone 14 Pro आणि 14 Pro Max मध्ये बऱ्याच नव्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. Dynamic Island मुळे युजर्सना आता अधिक चांगल्या प्रकारे नोटिफिकेशन्स दिसतील. A16 प्रोसेसर, पूर्ण दिवस चालणारी बॅटरी, 48MP चा कॅमेरा, नवा फ्रंट कॅमेरा, नवा 12MP अल्ट्रावाईड कॅमेरा, पडल्यावर अलर्ट अशा सोयी देण्यात आल्या आहेत.
अॅपलने त्यांच्या नेहमीच्या वॉच सिरीज ८ सोबत आता खास ट्रेकर्स, स्वीमर्स किंवा ज्याना जास्त ट्रॅकिंग व डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी नवं Apple Watch Ultra आणलं आहे.