Moto G42 या मोटो कंपनीचा भारतात उपलब्ध होणारा नवा फोन असून हा स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय असेल. या फोनमध्ये 20:9 AMOLED डिस्प्ले, 50MP ट्रिपल कॅमेरा सेटप, SD680 प्रोसेसर, Dolby Atmos Stereo स्पीकर्स, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
यापेक्षा अधिक चांगलं हार्डवेअर असलेल्या Moto G52 आणि G42 यांच्या किंमतीत फक्त ५०० रूपयांचाच फरक आहे. G42 ची किंमत आणखी थोडी कमी ठेवली असता त्यामधील फरक जाणवला असता. G52 ची किंमत १४४९९ पासून सुरू होते तर G42 ची १३९९९. अर्थात उपलब्ध होताना असलेल्या खास ऑफर्समुळे याची किंमत थोडी कमी होईल.
SBI कार्ड ग्राहकांना १००० रु अतिरिक्त सूट मिळेल. हा फोन ११ जुलै पासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल.
डिस्प्ले : 6.47″ AMOLED Display 60Hz
प्रोसेसर : Snapdragon 680
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB + microSD Support Upto 1TB
कॅमेरा : 50MP + 8MP Ultrawide Camera + 2MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 20W Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12
इतर : Bluetooth 5.0, NFC, Type C Port, side fingerprint sensor, 3.5mm audio jack, FM Radio
नेटवर्क : 4G
रंग : Atlantic Green, Metallic Rosé
किंमत : 4GB+64GB: ₹१३,९९९