जियोने त्यांच्या ग्राहकांसाठी गेमिंग खेळणं सोपं व्हावं यासाठी प्रथमच गेम कंट्रोलर आणला असून हा आपल्या अँड्रॉइड फोन्स, टॅब्लेट, टीव्हीसह जियोच्या सेट टॉप बॉक्सला सुद्धा ब्ल्युटुथद्वारे जोडता येतो. यामुळे टीव्हीचं मेनू नॅविगेशनसुद्धा आणखी चांगल्या प्रकारे करता येईल.
इतर उपलब्ध कंट्रोलर्सच्या तुलनेत याचं डिझाईन साधं सोपं असून हा सध्यातरी एकाच रंगात उपलब्ध होत आहे. याची किंमत ३४९९ इतकी ठेवली आहे. हा घेण्यासाठी जियोने चक्क EMI चा सुद्धा पर्याय दिला आहे.
याची बॅटरीलाईफ ८ तासांची असून एका चार्जवर ८ तास गेमिंग तुम्ही करू शकाल. चार्ज करण्यासाठी त्यांनी जुनं microUSB पोर्ट दिलं आहे. इतर उपकरणांपेक्षा जियोच्या सेट टॉप बॉक्सवर गेमिंग करता यावं हा यागचा मुख्य उद्देश दिसून येत आहे.
Buy Jio Game Controller : jio.com/shop/en-in/jio-game-controller/p/491894897
Jio Game Controller Specs :
Compatible Devices Android Tablets, Android TV, Android & Jio STB
For best results, it is recommended to be used with Jio Set – Top Box
Charging Connection Micro USB Type B Port
Product Dimensions 153X58X110 mm
Battery Built in rechargeable lithium ion battery
Colour : Matte Black
Weight : 200 gm
Connectivity : Bluetooth 4.1
Layout 20 buttons + 2 sticks
हा गेम कंट्रोलर उपलब्ध होत असला तरी सध्या बाजारात इतर ब्रॅंडसच्या यापेक्षा चांगले गेम कंट्रोलर्स कमी किंमतीत उपलब्ध आहेत. त्यांची तुलना करून ते तुमच्या पीसी, अँड्रॉइड, गेमिंग कॉन्सोल्सवर वापरू शकता. जियोचा गेम कंट्रोलर सध्यातरी गुणवत्ता आणि सोयीच्या बाबतीत चांगला वाटत नाही. जियोच्या सेट टॉप बॉक्सवर वापरायचाच असेल तर घेऊ शकता.