सॅमसंगने आज मागील बाजूस तीन कॅमेरा असणारा त्यांचा पहिलाच स्मार्टफोन सादर केला आहे. यामध्ये २४MP मुख्य कॅमेरा, 5MP डेप्थ कॅमेरा तर 8MP 120 डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्स चा समावेश आहे. 8MP 120डिग्री अल्ट्रा-वाइड लेन्सचा पाहण्याचा अँगल मानवी डोळ्यांऐवढाच आहे. यामुळे आपण पाहतो त्यासारखे वाइड अँगल फोटो काढण्यास मदत होईल असे सॅमसंगतर्फे सांगण्यात आले आहे. सॅमसंगच्या मते तरुणांमध्ये दररोज कॅमेरा वापरण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर असून सेल्फी सोबतच रिअर कॅमेराचा दुप्पट वापर केला जात असल्याचे पाहूनच हा स्मार्टफोन डिझाइन करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलक्सी A7 मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर उजव्या बाजूस आहे. त्याबरोबरच सॅमसंगचा सुपर एमोलेड इन्फिनिटी डिस्प्ले, 24 MP सेल्फी कॅमेरा, Exynos 7885 प्रोसेसर यांचा समावेश आहे. AR ईमोजीच्या मदतीने सेल्फी ईमोजीमध्ये तसेच GIF मध्ये सुद्धा रूपांतरित करण्याची सोय यामध्ये आहे. सोबतच पिक्सेल बिंनिंग ज्याद्वारे लो लाईट डिटेक्ट करून चांगल्या फोटोसाठी पिक्सेल एकत्र केले जातील, लाईव्ह फोकस फीचरच्या मदतीने फोटो क्लिक करताना व क्लिक केल्यानंतरही डेप्थ इफेक्ट एडिट करता येणार आहे. सीन ऑप्टिमायझर, प्रो लाइटनिंग यांसारख्या सुविधांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
सॅमसंग गॅलक्सी A7 (2018) २७ व २८ सप्टेंबर रोजी खास सेलच्या रूपात फ्लिपकार्ट, सॅमसंग ई-शॉप मध्ये उपलब्ध होईल. तसेच १८०००० आउटलेट मध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
Samsung Galaxy A7 (2018) Specifications
डिस्प्ले : 6 inch (2220х1080) FHD+ Display
प्रोसेसर : Samsung Exynos 7885. Octa Core 2.2GHz, 1.6GHz
रॅम : 4/6 GB
स्टोरेज : 64/128 GB (Expandable Upto 512GB)
बॅटरी : 3300 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.0
कॅमेरा : 24MP (f1.7) + 5MP f(2.2) + 8MP f(2.4) Ultra Wide, 120°
फ्रंट कॅमेरा : 24 MP (f/2.0)
रंग : Black, Blue, Gold
सेन्सर : Fingerprint Reader (On the Side), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope, Hall Sensor
इतर : USB Type-B, Dolby Audio, GPS/GLONASS, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Gorilla Glass 3
किंमत : (4+64)GB : ₹२३,९९०
(6+128)GB : ₹२८,९९०