पब्जी म्हणजेच Player Unknown’s Battlegrounds आता पीसी आणि गेमिंग कॉन्सोल्सवर मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गेम डिसेंबर २०१७ मध्ये सादर करण्यात आली होती. अल्पावधीतच एकावेळी जगात सर्वाधिक ऑनलाइन प्लेयर्स ही गेम खेळत असल्याचा विक्रम सुद्धा या गेमने केला होता. या गेममुळेच बॅटल रोयाल हा प्रकार प्रसिद्ध झाला होता आणि नंतर बऱ्याच गेम्समध्ये तो मोड पाहायला मिळू लागला.
पब्जी पीसीची लोकप्रियता पाहूनच नंतर पब्जी मोबाइल ही गेम मोबाइल यूजर्ससाठी २०१८ मध्ये सादर झाली होती. PUBG ची निर्मिती Krafton या साऊथ कोरियन कंपनीच्या PUBG Corporation अंतर्गत करण्यात आली होती. आता ही गेम F2P म्हणजे फ्री टू प्ले प्रकारची असेल.
सुरुवातीला बरीच प्रसिद्ध असलेली ही गेम नंतरच्या काळात Optimized नसल्यामुळे त्यामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे मागे पडत गेली. शिवाय फोर्टनाइटने मोठी स्पर्धा उभी केली आणि त्यात फोर्टनाइट व इतर पर्याय गेमर्सना आधीपासूनच मोफत उपलब्ध होते.
आता ही PUBG मोफत उपलब्ध झाल्यामुळे PUBG ला पुन्हा एकदा काही प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो. ज्यांनी आधी पैसे देऊन ही गेम विकत घेतली आहे त्यांना मोफत Battlegrounds Plus, Battle-Hardened costume skin set, the Shackle and Shanks Legacy Pan and the Battle-Hardened Legacy nameplate मिळतील!
यासोबत Battlegrounds Plus नावाच प्रीमियम अकाऊंट पर्याय दिला जो $13 मध्ये मिळेल ज्यामध्ये 1,300 G-COIN, Survival Mastery XP + 100% boost, Career – Medal tab, Ranked Mode, Custom Match functionality आणि इतर बरेच नवीन इन गेम फीचर्स वापरता येतील.
PUBG on Steam : https://store.steampowered.com/app/578080/PUBG_BATTLEGROUNDS