गेल्या आठवड्यात एयरटेल आणि Vi ने त्यांची दरवाढ जाहीर केल्यावर आता रिलायन्स जिओने सुद्धा त्यांचे प्रिपेड प्लॅन्सचे दर वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. नवे दर १ डिसेंबर २०२१ पासून लागू होतील.
अजूनही तुलेनेने जिओच्या प्लॅन्स इतरांपेक्षा स्वस्त दिसत आहेत. शिवाय जिओ प्लॅन्स सोबत येणाऱ्या लाईव्ह टीव्ही, न्यूज, मासिके अशा इतर सोयीसुद्धा जास्त आहेत. मात्र त्यांची 4G सेवेची गुणवत्ता बऱ्याच ठिकाणी घसरली आहे असं आमच्या बऱ्याच वाचकांनी मत नोंदवलं आहे. बाकी हे त्या त्या ठिकाणावर व इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असलं तरीही कंपन्यांनी नुसते दर न वाढवता सेवेची गुणवत्तासुद्धा सुधारायला हवी.
इतके दिवस हे स्वस्त प्लॅन्सचे आता लवकरच संपण्याच्या वाटेवर आहेत. कमी पैशात इंटरनेटची सवय लावून आता सर्वच टेलिकॉम कंपन्या एकदम प्लॅन्सच्या किंमती वाढवत नेत असल्याच दिसत आहे. या सर्वांमध्ये फक्त कॉलिंग आणि अमर्याद व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स बंद झाले. आता प्रत्येकाला दर महिना रीचार्ज करावाच लागतो. एकंदर पुढे येणाऱ्या काळात या प्लॅन्समध्ये काय बदल पाहायला मिळतील आणि 5G आल्यावर यांची अवस्था काय असेल यावरसुद्धा लक्ष ठेवावं लागेल.
खाली एयरटेल, Vi आणि जिओच्या नव्या प्रिपेड प्लॅन्सची माहिती दिली आहे.
ााता ाातहवाताय तॆ सुवारन दिवास जॆवा 399 मादहॆ 3 माहिनॆ data मिलात हॊता.
this is caused due to low compitation.