गूगल इंडियाच्या होमपेजवर आज पाहायला मिळणारं डूडल भारतीय जैववैद्यक (Biologist) डॉ. कमल रणदिवे यांना समर्पित आहे. त्यांच्या जन्म १९१७ साली पुण्यात झाला असून त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक असू शकतो आणि त्यामध्ये असलेल्या संबंधाबाबत संशोधन केलं होतं. त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलने त्यांच्या होमपेजवर खास डूडलद्वारे मानवंदना दिली आहे.
या डूडलबद्दल अधिक माहिती : https://www.google.com/doodles/dr-kamal-ranadives-104th-birthday
डॉ. कमल रणदिवे जैववैद्यकशास्त्र क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांचा जन्म 1917 साली पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. त्यांना कुष्टरोगासाठी कारणीभूत आलेल्या Mycobacterium leprae चाही अभ्यास करून त्याच्या लसीसंदर्भातही कार्य केलं आहे. पेशींच्या अभ्यासाठी असलेल्या cytology मध्ये पदवी मिळवून त्यांनी इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये आपलं रिसर्चर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
१९७३ मध्ये त्यांनी त्यांच्या ११ सहकाऱ्यांसह Indian Women Scientists’ Association (IWSA) सुरू केली जे महिला वैज्ञानिकांना सहकार्य करण्यासाठी तयार करण्यासाठी आली होतं.
१९८९ मध्ये सेवा निवृत्तीनंतर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात स्त्रियांना आरोग्य सेविका बनण्यासाठी प्रशिक्षित केलं आणि आरोग्य व पोषण संबंधित शिक्षण दिलं.
गूगलने आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अपरिचित व्यक्तीची देशाला ओळख करून दिली आहे. यापूर्वी रुखमाबाई राऊत ज्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यांचीही ओळख अशाचप्रकारे झाली होती. आजचं हे डूडल Ibrahim Rayintakath यांनी रेखाटलं आहे.