सॅमसंगने त्यांच्या लोकप्रिय Galaxy M51 नवी आवृत्ती Galaxy M52 5G आज भारतात सादर केली असून यामध्ये 6.7″ sAMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 778G प्रोसेसर, 64MP ट्रिपल कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 11 5G बॅंड देण्यात आले आहेत. बॅटरी 5000mAh ची असून सोबत 25W फास्ट चार्जिंग दिलेलं आहे.
हा फोन ३ ऑक्टोबरपासून खरेदीसाठी ॲमेझॉनवर त्यांच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलवेळी उपलब्ध होणार आहे. याचं सध्यातरी एकच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून 8GB+128GB मॉडेलसाठी याची किंमत ३४९९९ अशी असून काही काळासाठी नव्या ग्राहकांना हा फोन २६९९९ रुपयांना मिळेल. शिवाय HDFC कार्ड धारकांना अधिक सूट मिळणार आहे.
Samsung Galaxy M52 5G on Amazon : https://amzn.to/2XWYl68
हा फोन मध्यम किंमतीमध्ये एक चांगला पर्याय म्हणता येईल. येणाऱ्या सेलमध्ये जर खरेदी केला तर सूट मिळू शकेल जी नंतर मिळण्याची शक्यता कमी आहे.
डिस्प्ले : 6.7 inch Full HD+ 120Hz Refresh Rate sAMOLED Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 778G Processor
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB + Expandable Upto 1TB via MicroSD Card
कॅमेरा : 64MP + 12MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5000mAh 25W Fast Charge
इतर : Bluetooth 5.0, Wi-Fi 6, side mounted fingerprint sensor, NFC, Wifi 6, Type C Port
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI Android 11
रंग : Black, White आणि Blue
किंमत :
8GB+128GB – ₹२६,९९९