डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

Disney+Hostar ची जागा आता JioHotstar ने घेतली आहे. या विलीनीकरणामुळे जियो सिनेमा आणि डिस्नी+ हॉटस्टारचा कंटेंट एकत्रित उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिज्नी यांनी त्यांच्या भारतातल्या मीडिया व कंटेंटचं अंदाजे 8.5 बिलियन डॉलर्सच्या कराराद्वारे विलीनीकरण केले आहे. १४ फेब्रुवारीपासून हा बदल सर्व वापरकर्त्यांना दिसू लागला.

हॉटस्टारची स्थापना २०१५ साली स्टार इंडियाने केली होती, ज्यामध्ये विविध भारतीय भाषांमधील टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही, चित्रपट आणि क्रीडा कार्यक्रमांचा समावेश होता. २०१९ साली, डिस्नीने 21st Century Fox चे अधिग्रहण केल्यानंतर, हॉटस्टार डिस्नीच्या मालकीचे झाले आणि त्याचे नाव डिस्नी+ हॉटस्टार असे ठेवले गेले. या प्लॅटफॉर्मवर भारतातल्या विविध भाषा आणि सोबतच डिज्नीच्या आंतरराष्ट्रीय कंटेंटचा समावेश होता, ज्यामुळे ते भारतातील अग्रगण्य स्ट्रीमिंग सेवांपैकी एक बनले.

जियो हॉटस्टारच्या आल्यावर आता जियो सिनेमा अॅप्स आणि वेबसाइटवरून वापरकर्त्यांना hotstar.com वर redirect केलं जात आहे. सध्या सदस्य असलेले वापरकर्ते त्यांच्या सध्याच्या प्लॅन आणि लाभांसह जियो हॉटस्टारवर प्रवेश करू शकतात. नवीन प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका आणि लाईव्ह क्रीडा कव्हरेज वापरकर्त्यांना उपलब्ध झालं आहे. Disney, Marvel, HBO, peacock, Paramount+, Star Wars, Pixar, National Geographic अशा जवळपास सर्व प्रमुख स्टुडिओचा कंटेंट एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल !

जियो हॉटस्टारच्या लोगोवरून मात्र त्यांची सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवण्यात आली. इतक्या मोठ्या कंटेंट आणि नावाजलेल्या कंपनीसाठी हा लोगो अगदीच सामान्य वाटत आहे.

JioHotstar Plans

जियो कालच नवी JioTele OS नावाची खास टीव्हीसाठी तयार करण्यात आलेली ऑपरेटिंग सिस्टम जाहीर केली आहे. ह्या ओएसवर आधारित टीव्ही जे BPL, JVC, Kodak आणि Thompson या कंपन्यानी बनवलेले आहेत ते लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत. इतर कंपन्यासुद्धा ही ओएस त्यांच्या टीव्हीमध्ये देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही ओएस AI ची मदत घेऊन चित्रपट आणि मालिका सुचवेल.

थॉमसनचा Thomson QLED TV (43TJQ0012) हा ४३ इंची QLED टीव्ही या ओएसवर आधारित असून याची किंमत १८९९९ असणार आहे. हा 4K टीव्ही असून यामध्ये 40W चे स्पीकर्स आहेत.

Exit mobile version