सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंगने परवा झालेल्या Galaxy Unpacked कार्यक्रमात त्यांचे घडी घालता येणारे नवे प्रीमियम फोन्स सादर केले आहेत. Z Fold6 हा घडी उघडून टॅब्लेट प्रमाणे वापरता येतो तर Z Flip6 उभी घडी घालून खिशात ठेवता येतो! यांच्यासोबत स्मार्ट वॉच मालिकेतील Galaxy Watch7, नवं Galaxy Watch Ultra आणि Galaxy Buds3, Buds3 Pro, Galaxy Ring यावेळी सादर करण्यात आले आहेत.

एकाच वेळी इतक्या गोष्टी लॉंच केल्या तरी यावेळी यापैकी बऱ्याच फोन्समध्ये आधीच्या तुलनेत जवळपास काहीच फरक नाही आणि वरून यांची किंमतही वाढवण्यात आली आहे! Watch Ultra वर सुद्धा Apple Watch Ultra ची नावसकट कॉपी केल्याचा आरोप होतोय! हेच Buds बाबतीतसुद्धा त्यांचं नेहमीचं डिझाईन बदलून Apple Airpod सारखं डिझाईन दिलं आहे!

Galaxy Z Fold6 : या फोनमध्ये 6.3-inch HD+ Dynamic AMOLED 2X बाहेरचा डिस्प्ले आणि 7.6-inch QXGA+ Dynamic AMOLED 2X ultra-thin glass Infinity Flex आतला डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB रॅम, 4400mAh बॅटरी, Android 13 OneUI 6, 50MP Ultrawide + 12MP Ultrawide+ 10MP Telephoto, 4MP Under Display Camera आणि बाहेरच्या डिस्प्लेवर 10MP असे एकूण ५ कॅमेरा सेन्सर यामध्ये आहेत.
या फोनची किंमत ₹1,64,999 (256GB), ₹1,76,999 (512GB), ₹2,00,999 (1TB) अशी आहे. या फोनची प्रि बुकिंग सुरू झाली आहे.

Galaxy Z Flip6 : या फोनमध्ये 6.7-inch inner flexible 2X Dynamic AMOLED Infinity Flex डिस्प्ले आणि 3.4 inch Super AMOLED बाहेरचा डिस्प्ले, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB रॅम, 4000mAh बॅटरी, Android 14 OneUI 6, 50MP Primary + 12MP Ultrawide, 10MP Selfie Camera असे कॅमेरा सेन्सर यामध्ये आहेत. याची भारतातली किंमत उद्या जाहीर होईल. या फोनची किंमत ₹1,09,999 (256GB) आणि ₹1,21,999 (512GB) अशी असेल. या फोनची प्रि बुकिंग सुरू झाली आहे.

Galaxy Watch7 & Watch Ultra : Watch Ultra हे नवं स्मार्ट घडयाळ आणलं असून हे Apple Watch Ultra चा स्पर्धक म्हणून उतरणार आहे. हे घडयाळ Rugged Design and Sleep Apnea Detection ची सोय असलेलं आहे! १०० तासांची बॅटरी लाईफ असलेल्या या घड्याळाची किंमत ५९९९९ इतकी आहे. Watch7 ची किंमत ३३९९९ पासून सुरू होते.

Galaxy Ring : गॅलक्सी रिंग हे नवं उत्पादन सॅमसंगने आणलं असून ही एक स्मार्ट अंगठी आहे की तुमच्या आरोग्यावर २४/७ लक्ष ठेऊ शकेल. याची बॅटरी ७ दिवसांपर्यंत टिकेल. सध्यातरी ही भारतात उपलब्ध होणार नाही.

Exit mobile version