काल झालेल्या Xbox Games Showcase 2024 कार्यक्रमात बऱ्याच नव्या गेम्स जाहीर करण्यात आल्या असून लवकरच उपलब्ध होणाऱ्या गेम्सचा गेमप्लेसुद्धा दाखवण्यात आला. एक्सबॉक्स आता कॉन्सोल, पीसी, एक्सक्लाऊड अशा माध्यमांद्वारे जवळपास प्रत्येक डिव्हाईसवर उपलब्ध झालेलं आहे. शिवाय एक्सबॉक्स गेम पास ही लोकप्रिय गेम सबस्क्रिप्शन सेवा गेल्यावर्षीच्या तुलनेत आता आणखी गेमर्सना एक्सबॉक्स गेम्सकडे घेऊन येत आहे.
या कार्यक्रमात अनेक गेम्स दाखवण्यात आल्या त्यापैकी काही गेम्स वगळता बऱ्यापैकी सर्व एक्सबॉक्स गेमपास वर उपलब्ध होणार आहेत! यानंतर Call Of Duty Black Ops 6 Direct द्वारे गेमबद्दल सर्व माहिती देण्यात आली. Activision कंपनीचं अधिग्रहण केल्यानंतर हा सर्वात मोठी एक्सबॉक्सचा सर्वात मोठा गेम रिलीज असेल. याची साईज तब्बल 309GB असेल असं दिसून आलं आहे! यावर्षीचा हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांच्या तुलनेत खूपच चांगला वाटला असं गेमर्सचं एकत्रित मत सोशल मीडियावर दिसून येत आहे!
बहुप्रतीक्षित Call of Duty Black Ops 6 या गेमचा गेमप्ले यावेळी दाखवण्यात आला. यासोबत खालील गेम्स जाहीर झाल्या किंवा त्यांचा गेमप्ले या कार्यक्रमात दाखवण्यात आला. यापैकी बऱ्याच गेम्स या वर्षी तर काही पुढच्या वर्षी उपलब्ध होतील.
Gears of War: E-Day, Doom: The Dark Ages, State of Decay 3, Indiana Jones and the Great Circle, Perfect Dark, South of Midnight, Starfield: Shattered Space, Azeroth, The War Within, World of Warcraft, Assassin’s Creed Shadows, Dragon Age: The Veilguard, Metal Gear Solid Δ: Snake Eater, Clair Obscur: Expedition 3, Atomfall, Winter Burrow, Wuchang: Fallen Feathers, Age of Mythology: Retold, Fable, Microsoft Flight Simulator 2024, Dragon Age: The Veilguard, Souls-lite Flintlock: The Siege of Dawn, FragPunk, Life Is Strange: Double Exposure, Mecha Break, Mixtape: Nothing But the Hits, S.T.A.L.K.E.R. 2: Heart of Chornobyl, Diablo IV: Vessel of Hatred, Fallout 76 Skyline Valley, Sea of Thieves Season 13, World of Warcraft: The War Within
यासोबत एक्सबॉक्स कॉन्सोलचेही नवे मॉडेल्स जाहीर झाले असून Xbox Series X 2TB SSD Special Edition Galaxy Black, Xbox Series X Robot White 1TB SSD आणि Xbox Series S Robot White 1TB SSD असे ते तीन पर्याय आहेत!