जिओ, एयरटेल आणि Vi ने त्यांच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या!

काल रिलायन्स जिओ आणि आज लगेचच एयरटेलने सुद्धा त्यांच्या प्रिपेड प्लॅन्सच्या किंमतीमध्ये जवळपास १२ ते २५% वाढ केली आहे! कदाचित Vi सुद्धा नवीन प्लॅन्स लवकरच जाहीर करेल. जरी किंमती वाढल्या असल्या तरी या प्लॅन्समध्ये मिळणारा डेटा आणि व्हॅलिडिटी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही कंपन्यांचे प्लॅन्स ३ जुलै २०२४ पासून लागू होतील. प्रिपेडसोबत काही पोस्टपेड प्लॅन्सच्याही किंमती वाढवल्या आहेत.

नेटवर्क टेक्नॉलजी आणि त्यासाठी लागणारी गुंतवणूक यानुसार एक यशस्वी बिझनेस मॉडेल सुरू ठेवण्यासाठी आम्हाला हे बदल करावे लागत आहेत असं एयरटेलने सांगितलं आहे. ARPU (Avarage Revenue Per User) म्हणजेच प्रत्येक ग्राहकाकडून मिळणारं सरासरी उत्पन्न ३०० च्या वर असावं असं त्यांचं म्हणणं आहे!

जिओचे सर्व नवे प्लॅन्स तुम्ही खालील इमेजमध्ये पाहू शकता. २०९ चा 1GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता २४९ रुपये करण्यात आला आहे. २९९ चा 2GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता ३४९ रुपये करण्यात आला आहे. जिओचे रु. ३९५ आणि रु. १५५९ चा प्लॅन आता रीचार्ज करण्यास उपलब्ध नाहीत असंही दिसून येत आहे!

मोफत अनलिमिटेड 5G सुद्धा आता फक्त 2GB/Day किंवा त्यावरील प्लॅन्सवरच वापरता येणार आहे! प्रिपेडसोबत काही पोस्टपेड प्लॅन्सच्याही किंमती वाढवल्या आहेत.

Jio New Plans 5G

तुम्ही ३ जुलै पूर्वी जिओचा रीचार्ज करून ठेवणार असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

एयरटेलनेसुद्धा त्यांचे नवे प्लॅन्स लगेच जाहीर केले असून त्यांचा २६५ चा 1GB/Day २८ दिवसांसाठीचा प्लॅन आता २९९ रुपये करण्यात आला आहे. इतर प्लॅन्स खालील इमेजमध्ये पाहू शकता.

Airtel New Plans 5G

तुम्ही ३ जुलै पूर्वी एयरटेलचा रीचार्ज करून ठेवणार असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा.

Vi New Plans

नवे प्लॅन्स ३ जुलैपासून लागू होणार असल्यामुळे ३ जुलैच्या आत तुम्ही जुन्या किंमतीत रीचार्ज करून ठेऊ शकता. त्यासाठी Jio Prepaid Plans ह्या लिंकवर आणि एयरटेलचे Airtel Prepaid Plans वर जाऊन तपासून पहा आणि मग रीचार्ज करा.

बरेच महिने स्वस्तात इंटरनेट आणि मोफत कॉलिंग देऊन सवय लावली आणि आता एकाधिकारशाही प्रमाणे या मोजक्या दोन तीन कंपन्या किंमती वाढवत आहेत अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जर फक्त कॉलिंगसाठी प्लॅन्स हवे असतील तर ते आता उपलब्ध नाहीतच. तुम्हाला इंटरनेट डेटा असलेलेच प्लॅन्स घ्यावे लागतात. ज्यांचा तसा काहीच वापर नाही त्यांनासुद्धा असे जास्त किंमतीचे रीचार्ज करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Exit mobile version