Baldur’s Gate 3 ठरली गेम ऑफ द इयर : द गेम अवॉर्ड्स २०२३

व्हिडिओ गेम जगतातील सर्वोत्कृष्ट गेम्स ओळखण्यासाठी The Game Awards हे आता एक मानक बनलं आहेत. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया मधील पीकॉक थिएटरमध्ये काल हा गेमिंग अवॉर्ड शो पार पडला. गेमर्स, गेम डेव्हलपर्स आणि गेम निर्माण करणाऱ्या कंपन्या यामध्ये सहभागी होतात. २०२३ मधील सर्वोत्तम गेम म्हणजेच गेम ऑफ द इयर होण्याचा मान Baldur’s Gate 3 या गेमला मिळाला आहे!

या कार्यक्रमात त्या त्या विभागातील विजेत्यांना सन्मानित करण्यासोबतच नव्या गेम्ससुद्धा जाहीर केल्या जातात. यावेळी Monster Hunter Wilds, OD Overdose, God of War Ragnarok Valhalla DLC, Marvel’s Blade, Jet Set Radio, The Finals, Light No Fire, Rise of the Ronin, Skull and Bones, Lost Records: Bloom and Rage, Dragon Ball Sparking Zero, Fortnite Rocket Racing, Exodus, Jurassic Park Survival, Visions of Mana, Arknights: Endfield, Suicide Squad: Kill the Justice League, World of Goo 2, इ. गेम्स जाहीर झाल्या किंवा त्यांचे गेमप्ले ट्रेलर्स सादर झाले आहेत.

२०२३ मधील गेम ऑफ द इयरसाठी नामांकन असलेल्या गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम स्पोर्ट्स/रेसिंग गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम मल्टीप्लेयर गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम ईस्पोर्ट्स गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम मोबाईल गेम्स अंतर्गत नामांकन असलेल्या गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम VR/AR गेम्स

२०२३ मधील सर्वोत्तम RPG गेम्स

आजवर Game of The Year GOTY ठरलेल्या गेम्स

2014 : Dragon Age: Inquisition
2015 : The Witcher 3: Wild Hun
2016 : Overwatch
2017 : The Legend of Zelda: Breath of the Wild
2018 : God of War
2019 : Sekiro: Shadows Die Twice
2020 : The Last of Us Part II
2021 : It Takes Two
2022 : Elden Ring
2023 : Baldur’s Gate 3

भारतात गेमिंग अलीकडे वाढत जाणारं क्षेत्र असलं तरी यामधील गेम्समधील बऱ्याच गेम्सच्या कधीही न ऐकलेल्या नावांवरून भारतातल्या गेमिंगचा अंदाज येईल. ठराविक मोबाईल गेम्स आणि ठराविक ई स्पोर्ट्स गेम्स पलीकडे यामधील कोणत्याही गेम्स भारतात प्रसिद्ध नाहीत. जगभरातील गेमिंग क्षेत्राने २०२२ मध्ये जवळपास 347 बिलियन डॉलर्सचं उत्पन्न मिळवलं होतं! यावरून हे क्षेत्र किती मोठं आहे याची कल्पना करता येईल.

सर्व विभागातील पूर्ण यादी पाहण्यासाठी लिंक : thegameawards.com

Exit mobile version