ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

युरोपियन यूनियनच्या दबावामुळे सरतेशेवटी ॲपलला त्यांच्या आयफोन्समध्ये Lightning Port ऐवजी USB Type C पोर्ट द्यावं लागलं असून आता त्यांच्या नव्या आयफोन १५ मालिकेतील फोन्समध्ये हे इतर स्मार्टफोन्समध्येही असलेलं पोर्ट मिळेल. यामुळे फक्त आयफोनसाठी वेगळी चार्जिंग केबल घेऊन फिरण्याची गरज उरणार नाही.

काल झालेल्या कार्यक्रमात ॲपलने Apple iPhone 15, 15 Plus, 15 Pro, 15 Pro Max हे आयफोन्स, Apple Watch Series 9, Apple Watch Ultra 2 सादर केले आहेत.

नव्या Type C पोर्ट मुळे आयफोन, आयपॅड, मॅकबुक सर्व उपकरणे एकाच केबलद्वारे चार्ज करता येतील. यासोबत AirPods ना सुद्धा आता चार्जिंगसाठी Type C पोर्ट असेल. iPhone 15 व iPhone 15 Plus मध्ये USB2 चाच स्पीड मिळणार असून अधिक वेगवान USB3 पोर्ट 15 Pro आणि 15 Pro Max मध्येच मिळेल!

iPhone 15 & 15 Plus

iPhone 15 Pro & 15 Pro Max

भारतीय किंमती खालील प्रमाणे (Apple iPhone 15 Indian Pricing)

Exit mobile version