ॲपलचे नवे मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ, मॅक प्रो व M2 Ultra जाहीर!

Apple MacBook Air Mac Studio Mac Pro

काल झालेल्या WWDC कार्यक्रमात ॲपलने त्यांचे नवे लॅपटॉप आणि प्रोफेशनल कॉम्प्युटर्स सादर केले असून यामध्ये नवीन १५ इंची मॅकबुक एयर, मॅक स्टुडिओ आणि मॅक प्रोचा समावेश आहे. आता मॅक प्रोमध्येही M2 Ultra चा समावेश झाल्यामुळे ॲपलच्या सर्व कॉम्प्युटर उपकरणांमध्ये इंटेल ऐवजी ॲपल सिलिकॉन आधारित प्रोसेसर्स जोडण्याचं काम पूर्ण झालं आहे.

नवीन मॅकबुक एयर मध्ये आता १५ इंची स्क्रीन देण्यात आल्यामुळे त्या बजेटमध्ये हा लॅपटॉप नक्कीच चांगला पर्याय बनला आहे. हा जगातला सर्वात कमी जाडीचा १५ इंची लॅपटॉप आहे असं ॲपलने म्हटलं आहे.

MacBook Air 15″ : M2 chip, 15.3-inch Liquid Retina डिस्प्ले, 1.24 kg, 11.5mm जाडी, MagSafe Charging, 2 thunderbolt पोर्ट्स, TouchID Headphone jack, 6 speakers, 18 hour battery life, आणि Silver, Midnight, Starlight, Black हे रंग
किंमत : ₹134900 (256GB) आणि ₹154900 (512GB) पासून सुरू

Mac Studio : M2 Max/M2 Ultra, Upto 24Core CPU, Upto 76 Core GPU, Wifi 6E, Bluetooth 5.3, 8K Display Support
किंमत : ₹2,09,900 पासून सुरू

Mac Pro : M2 Ultra Chip with 24 Core CPU, Upto 76 Core GPU, Wifi 6E, Bluetooth 5.3, Upto 192GB Unified Memory (RAM) Six open PCIe gen4 Slots
किंमत : ₹7,29,900 पासून सुरू

Exit mobile version