आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन! यूट्यूब प्रीमियम सदस्य झाल्यावर आपल्याला कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. व्हिडिओ, गाणी बॅकग्राऊंडमध्येही सुरू ठेवता येतात, इंटरनेट नसताना व्हिडिओ ऑफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड करता येतात आणि सोबतच यूट्यूब म्युझिक प्रीमियमसुद्धा मिळतं!
लिंक : https://www.youtube.com/premium
यूट्यूब प्रीमियममधील सोयी
- अॅडफ्री : कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दिसणार नाहीत.
- बॅकग्राउंड प्ले : इतर अॅप्स वापरत असताना किंवा स्क्रीन लॉक केलेली असताना विनाव्यत्यय व्हिडिओ पहा.
- डाउनलोड : इंटरनेट नसताना पाहण्यासाठी आधीच व्हिडिओ डाउनलोड करता येतात.
- यूट्यूब म्युझिक प्रीमियम : नवीन संगीत अॅप डाउनलोड करा आणि व्यत्ययांशिवाय गाणी/संगीत ऐका.
- यूट्यूब चाचणी करत असलेल्या फीचर्स सर्वात आधी वापरता येतील!
यूट्यूब प्रीमियम बाबत लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी
- या यूट्यूब फॅमिलीमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त फॅमिली मॅनेजरकडे असतो.
- आपण एकदा जॉइन केलेली फॅमिली १२ महिने पूर्ण झाल्याशिवाय बदलू शकत नाही.
- कोणत्याही सदस्याला इतर सदस्याने पाहिलेल्या व्हिडिओची हिस्ट्री, लाईक्स, Subscriptions दिसत नाहीत.
- तुम्ही हा प्लॅन कधीही बंद करू शकता. पैसे भरलेल्या चालू महिन्यातील उर्वरित दिवस ही सेवा तुमचा प्लॅन बंद केल्यावरही वापरता येईल.