गेली अनेक वर्षं मागणी असलेली एकच व्हॉट्सॲप फोन क्रमांक / अकाऊंट अनेक फोन्सवर वापरता येईल अशी सोय सरतेशेवटी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल काल स्वतः मार्क झकरबर्ग यांनी माहिती दिली आहे. पूर्वीच्या WhatsApp Web, WhatsApp Desktop सोबतच आता एकावेळी चार वेगवेगळ्या फोन्सवर एकच व्हॉट्सॲप नंबर वापरता येईल!
छोटे व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. सोबतच एकापेक्षा अधिक फोन्स वापरणाऱ्या युजर्ससाठीही हा नवा पर्याय आहे.
हे करण्यासाठी आपल्या आधीच व्हॉट्सॲप इंस्टॉल केलेल्या फोनला Primary Phone असं गृहीत धरलं जाईल आणि नंतर आपण लॉगिन करणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या, इ. फोन्सना Companion Phones असं समजलं जाईल.
- तुमच्या नव्या/दुसऱ्या फोन (Companion)वर WhatsApp इंस्टॉल करा
- ओपन केल्यावर उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या More Options
वर टॅप करा. - त्यानंतर Link to existing account
- आता एक QR कोड दिसेल जो आपल्याला पहिल्या आधीच व्हॉट्सॲप लॉगिन केलेल्या फोन (Primary) मध्ये स्कॅन करायचा आहे.
- त्यासाठी पहिल्या म्हणजेच Primary फोनमध्ये व्हॉट्सॲप उघडा
- त्यामध्ये More Options
> Linked Devices > Link a device - आता कॅमेरा उघडला असेल त्याद्वारे नव्या/दुसऱ्या फोनमध्ये दिसत असलेला QR कोड स्कॅन करा.
- आता तेच अकाऊंट या फोनमध्ये सुरू झालेलं दिसेल.
व्हॉट्सॲप अनेक फोन्सवर वापरत असताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.
- Live Location आणि स्टेट्स या सोयी दुसऱ्या फोन (Companion) मध्ये वापरता येणार नाहीत.
- जर तुमच्या मुख्य (Primary) फोनमध्ये १४ दिवस व्हॉट्सॲप वापरलं नसेल तर या दुसऱ्या Companion फोन्सवरुन व्हॉट्सॲप लॉगआउट होईल.
- लॉगआउट झाल्यावर तुम्हाला वरील कृती पुन्हा करावी लागेल.
- लॉगिन केलेले फोन्स पाहण्यासाठी Settings मध्ये Linked Devices वर जा.
- तुम्ही iOS व अँड्रॉइड असे दोन्ही प्रकारचे फोन्स लिंक करू शकता.
- तुमची एक वर्षा पर्यंतची चॅट हिस्ट्री Sync होईल.