नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

ही कंपनी आता फोन्स बनवत नाही हे दर्शवण्यासाठी नव्या लोगोची निर्मिती! जुनी नोकिया कंपनी आता नेटवर्क आणि क्लाऊड क्षेत्रात उत्पादने आणि सेवा पुरवते.

काही दिवसांपूर्वी मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस (MWC) मध्ये त्यांनी हा नवा बदल जाहीर केला आहे. नोकिया हा एकेकाळी सर्वात यशस्वी फोन ब्रॅंड होता मात्र काळानुरूप स्वतःमध्ये बदल न केल्याने त्यांना त्यांचा फोन बनवणारा विभाग विकुन टाकावा लागला. २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टने नोकियाचा फोन बिझनेस विकत घेतला. मात्र त्यांनासुद्धा तो चालवता आला नाही.

ADVERTISEMENT

२०१६ मध्ये हा नोकिया नावाचा ब्रॅंड HMD Global या कंपनीने विकत घेतला आणि नोकिया मोबाइल या नावाने अँड्रॉइड स्मार्टफोन्स बाजारात आणले.

मात्र अजूनही लोकांना मूळ नोकिया कंपनी फोन कंपनी आहे असं वाटत असल्याचं नोकियाच्या प्रमुखांनी सांगितलं असून यामुळेच हा लोगो बदल करण्यात आला आहे. सध्या ही कंपनी जगभरात नेटवर्क, 5G, डेटा सेंटर, सेक्युरिटी, सॉफ्टवेअर सेवा पुरवत आहे.

Exit mobile version