भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

रविवारी श्रीहरीकोटा येथून भारताचं सर्वात मोठं रॉकेट Launch Vehicle Mark-III म्हणजेच LVM3 चं प्रक्षेपण यशस्वी झालं आहे. इस्रोच्या या रॉकेटने OneWeb कंपनीच्या ३६ सॅटेलाइटसह उड्डाण केलं आहे.

LVM-III रविवारी UK-आधारित नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेड (OneWeb) चे ३६ उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित केले आहेत. वनवेब ग्रुप कंपनीने LEO मध्ये ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ISRO ची व्यावसायिक शाखा NewSpace India Ltd सोबत करार केला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ISRO ने OneWeb चे 36 उपग्रह प्रक्षेपित करून दोन्ही संस्थांमधील मोहिमांची सुरुवात केली. OneWeb हे अंतराळातून चालणारे जागतिक संप्रेषण नेटवर्क आहे, जे सरकार आणि व्यवसायांसाठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देतं.

ADVERTISEMENT

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलेल्या माहितीनुसार इस्रोच्या गगनयान या महत्वाकांक्षी मोहिमेतसुद्धा हेच LVM3 रॉकेट वापरलं जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे आज त्या मोहिमेसाठी या रॉकेटची चाचणी झाली आहे.

OneWeb मध्ये भारतातील एयरटेल कंपनीची मालकी असलेली भारती एंटरप्राइजची मोठी गुंतवणूक आहे.

Exit mobile version