ट्विटरची Twitter Blue नावाची सेवा भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात झाली असून या सेवेच्या सर्व सभासदांना ट्विटरवर ब्ल्यु टिक मिळेल. याचे प्लॅन्स भारतात ६५० पासून सुरू होत आहेत.
या सेवेचे सभासद झाल्यावर तुम्हाला खालील सोयी ट्विटरवर मिळतील.
- प्रोफाइलच्या नावापुढे ब्ल्यु टिक
- रीप्लाईज, मेन्शन्स आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल.
- जास्त लांबीचे व्हिडिओ टाकता येतील
- इतरांच्या तुलनेत अर्ध्याच जाहिराती दिसतील.
- चाचणी सुरू असलेल्या फीचर्स इतरांच्या आधी वापरता येतील उदा. पुढील दोन फीचर्स.
- ट्विटस एडिट करता येतील
- 1080p रेजोल्यूशनचे व्हिडिओ अपलोड करता येतील.
अँड्रॉईड व iOS वर गूगल आणि ॲपलला ॲप स्टोरसाठी द्याव्या लागणाऱ्या फीमुळे किंमत जास्त असल्याचं सध्याचे ट्विटर प्रमुख इलॉन मस्क यांनी यापूर्वीच सांगितलं आहे!