गूगलने भारताला पहिलं ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या ९७ व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या होमपेजवर खास डूडलद्वारे मानवंदना दिली आहे.
अधिक माहिती https://www.google.com/doodles/khashaba-dadasaheb-jadhavs-97th-birthday
खाशाबा जाधव (जन्म : गोळेश्वर-कऱ्हाड, १५ जानेवारी १९२६; – १४ ऑगस्ट १९८४) हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
खाशाबा जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
माहिती स्त्रोत : विकिपीडिया