ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉनने आज काही गाजावाजा न करता त्यांची प्राइम गेमिंग सेवा भारतात उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर आधीच ॲमेझॉन प्राइमचे सदस्य असाल तर तुम्हाला ही प्राइम गेमिंग सेवासुद्धा त्यामध्येच मिळणार आहे! प्राइम व्हिडिओ, म्युझिक, रीडिंग नंतर आता ही गेमिंग सेवा भारतात आली आहे.

प्राइम गेमिंगमध्ये बऱ्याच गेम्स मोफत खेळता येणार असून सोबत विविध प्रसिद्ध गेम्समधील in-game कंटेंट उदा. स्कीन्ससुद्धा मोफत मिळणार आहेत! यांच्या फ्री गेम्स एकदा घेतल्यानंतर पुढे कायम खेळता येणार असून प्राइम मेंबरशिप बंद केली तरीही या गेम्स तुमच्या गेम लायब्ररीमध्ये उपलब्ध असतील.

प्राइम गेमिंग सेवा कशी वापरायची ?
  1. gaming.amazon.com या वेबसाइट वर जा
  2. तुमच्या ॲमेझॉन प्राइम अकाऊंटने लॉगिन करा.
  3. Activate Prime Gaming वर क्लिक करा.
  4. आता तुम्ही प्राइम गेमिंग वापरू शकता!

सध्या भारतात Quake, Spinch, Desert Child, Deathloop आणि Brothers: A Tale of Two Sons अशा गेम्स मोफत उपलब्ध आहेत. शिवाय Call of Duty: Modern Warfare 2 Season 1, Apex Legends, Valorant, League of Legends अशा गेम्समधील स्कीन्ससुद्धा मोफत दिल्या आहेत.

जर तुमच्याकडे प्राइमची मेंबरशिप नसेल तर ३० दिवस फ्री ट्रायल घेऊ शकता त्यानंतर वार्षिक ₹१४९९ देऊन प्राइमच्या सर्व सेवा एकाच मेंबरशिपमध्ये वापरू शकता.

Exit mobile version