एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

काल झालेल्या Xbox & Bethesda Games Showcase 2022 कार्यक्रमात बऱ्याच नव्या गेम्स जाहीर करण्यात आल्या असून लवकरच उपलब्ध होणाऱ्या गेम्सचा गेमप्लेसुद्धा दाखवण्यात आला आहे. एक्सबॉक्स आता कॉन्सोल, पीसी, एक्सक्लाऊड अशा माध्यमांद्वारे जवळपास प्रत्येक डिव्हाईसवर उपलब्ध झालेलं आहे. शिवाय एक्सबॉक्स गेम पास या लोकप्रिय गेम सबस्क्रिप्शन सेवेमुळे आणखी गेमर्स यांच्या गेम्सकडे वळत आहेत.

सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली बहुप्रतीक्षित स्टारफील्ड (Starfield) या गेमचा गेमप्ले यावेळी दाखवण्यात आला. यामध्ये कॅरक्टर कसं तयार करायचं, या गेमच्या जगात फिरण्यासाठी असलेले पर्याय, १०० सिस्टम्स, १००० ग्रह, गेमप्ले आणि बरच काही यावेळी प्रदर्शित केलं गेलं!

यासोबत Redfall, Diablo 4, Overwatch 2, Forza Motorsport, Minecraft Legends, Ark 2, COCOON, Ravenlok, Hollow Knight: Silksong, Ara: History Untold, Ereban, Lightyear Frontier, Persona 4, NARAKA: BLADEPOINT अशा एकूण ३१ गेम्स एक्सबॉक्सवर उपलब्ध होत आहेत.

शिवाय Forza Horizon 5, Microsoft Flight Simulator, The Elder Scrolls Online, Fallout 76 आणि Sea of Thieves अशा आधीच्या गेम्सनया खास DLC मार्फत नवा कंटेंट मिळणार आहे!

Riot Games सोबत भागीदारी करून त्यांच्या League of Legends, Valorant आणि Wild Rift सारख्या गेममधील कंटेंट गेम पास सदस्यांना मिळेल अशी घोषणा केली.

Xbox Game Studios आणि Kojima Productions हे एकत्र येत एक नवी गेम डेव्हलप करत असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं आहे.

Exit mobile version