टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

Telegram Premium

टेलिग्राम या प्रसिद्ध मेसेजिंग ॲपने आज त्यांचा प्रीमियम प्लॅन जाहीर केला असून यामध्ये बऱ्याच वेगळ्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. शिवाय यासोबतच टेलिग्रामने दरमहा ७० कोटी ॲक्टिव्ह युजर्सचा टप्पा गाठला असल्याचंही सांगितलं आहे!

तुम्ही जर सध्या फ्री टेलिग्राम वापरत असाल तर पुढेसुद्धा पूर्वीप्रमाणेच टेलिग्रामच्या मोफत आवृत्तीचा वापर सुरू ठेऊ शकता. तुमच्या कोणत्याही फीचरला हात लावण्यात आलेला नाही.
जर तुम्हाला खाली उल्लेख असलेल्या अधिक सोयी हव्या असतील तरच तुम्हाला प्रीमियम प्लॅन घ्यावा लागेल.

बऱ्याच न्यूज चॅनल्सनी पुन्हा एकदा क्लिकबेट बातम्या देत टेलिग्राम वापरयला पैसे द्यावे लागणार असं शीर्षक दिलं होतं मात्र तसं काहीही नाही. प्रीमियम प्लॅन ऐच्छिक असणार आहे.

इतरही बऱ्याच सोयी देण्यात येतील ज्याबद्दल अधिक माहिती https://telegram.org/blog/700-million-and-premium या लिंकवर वाचू शकता.

भारतात ही प्रीमियम प्लॅन कधीपासून उपलब्ध होईल हे सांगितलेलं नाही. मात्र येत्या काही दिवसात हा प्लॅन ₹४६९ दरमहा या दराने भारतात उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. अपडेटद्वारे हळूहळू इतर ठिकाणी हा प्लॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसं पाहायला गेलं तर या नव्या सोयी पैसे देऊन वापरण्याइतकं वेगळेपण नक्कीच देत नाहीत त्यामुळे हे प्लॅन वापरण्याचं प्रमाण फार कमी असेल असं सध्यातरी दिसत आहे.

Search Terms : What is Telegram Premium Plans Features Price in India

Exit mobile version