इंन्स्टाग्रामने बऱ्याच दिवसांनी त्यांच्या एकूण रंगसंगती मध्ये बदल केला असून यामध्ये त्यांनी नवा लोगो, नवा फॉन्ट आणि इतर ब्रॅंड एलिमेंट्सचा समावेश केला आहे. नवा लोगो थोड्या वेगळ्या gradient मध्ये तयार करण्यात आला असून हा App लोगो सोबत इतर स्टोरी, क्रिएट मोड अशा ठिकाणीही वापरला जाईल.
नव्या लोगोसोबत त्यांनी Instagram Sans हा नवा फॉन्टसुद्धा आणला असून हा फॉन्ट वेगवेगळ्या टाइपसाठी अनेक भाषांना सपोर्ट करतो. जगभरात कुठेही तो पाहता आला पाहिजे असा यामागे प्रमुख उद्देश असल्याचं मेटातर्फे सांगण्यात आलं आहे.
लवकरच इंन्स्टाग्रामवर टिकटॉकप्रमाणे फीडमध्ये फुलस्क्रीन कंटेंट दाखवण्यास सुरुवात केली जाणार आहे. याची चाचणी सुरू झाली असून येत्या काही दिवसात हा बदल सर्वांना दिसू लागेल.