व्हॉट्सॲप मेसेजेसला रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध !

WhatsApp Reactions

मेटाचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपने आजपासून मेसेजेसवर वेगवेगळ्या इमोजीच्या रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी WhatsApp Communities बद्दल माहिती देताना याची घोषणा करण्यात आली होती.

ही सोय हळूहळू सर्वाना उपलब्ध करून देण्यात येत असून तुम्हाला हा बदल लगेच दिसत नसेल तर येत्या काही दिवसात दिसू लागेल. तूर्तास तुमचं व्हॉट्सॲप प्ले स्टोअर/ॲप स्टोअरमधून अपडेट करून घ्या. सध्या 👍❤️😂😮😢🙏 या इमोजी उपलब्ध होत असून लवकरच आणखी एक्सप्रेशन्ससुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील असं मार्कने सांगितलं आहे.

व्हॉट्सॲप रिॲक्शन्सचा वापर कसा करायचा?

१. प्रथम कोणतंही चॅट उघडा.
२. आता ज्या मेसेजवर react करायचं आहे तो निवडून प्रेस अँड होल्ड करा.
३. आता तुम्हाला सहा इमोजी आलेल्या दिसतील.
४. बोट सरकवून एका योग्य इमोजीची निवड करा
५. त्या मेसेजवर तुमची रिएक्शन दिसू लागेल!

ADVERTISEMENT
Exit mobile version