Epic Games चा मेगा सेल सुरू : ४ फ्री गेम्स मिळणार!

एपिक कंपनीने त्यांच्या एपिक गेम स्टोअरवर त्यांचा मेगा सेल सुरू केला असून यामध्ये बऱ्याच प्रसिद्ध गेम्सवर २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळते शिवाय दर गुरुवारी एक प्रसिद्ध गेम मोफत मिळेल! पहिल्या गुरुवारी त्यांनी Borderlands 3 ही गेम मोफत उपलब्ध करून दिली आहे!

हा सेल १६ जूनपर्यंत चालणार असून या दरम्यान तुम्हाला खरेदीसाठी २५% ऑफचं कुपन दिलं जाईल. जे वापरुन तुम्ही सेलमधील ऑफरअंतर्गत उपलब्ध गेम्स खरेदी करू शकता.

ADVERTISEMENT

दर गुरुवारी Mystery Game अंतर्गत एक अशा एकूण चार गेम्स मोफत डाउनलोड करता येतील! सर्वात आधी Borderlands 3 ही फर्स्ट पर्सन शूटर गेम मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://store.epicgames.com/en-US/ या लिंकवर जाऊन नोंदणी करून तुम्ही या गेम्स मिळवू शकता. एपिक गेम्स स्टोअर मोफत गेम्स देण्याबाबत प्रसिद्ध असून दर आठवड्याला एक गेम यांच्याकडे मोफत दिली जाते. तुम्ही ती गेम डाउनलोड न करता फक्त तुमच्या गेम लायब्ररीमध्येही अॅड करून ठेऊ शकता आणि नंतर वाटेल त्यावेळी डाउनलोड करून खेळू शकता! काही वर्षांपूर्वी त्यांनी चक्क GTA V सुद्धा मोफत दिली होती!

Exit mobile version