टाटाचं Tata Neu सुपरॲप आता उपलब्ध : ॲमेझॉन व फ्लिपकार्टसोबत थेट स्पर्धा!

Tata Neu App

खूप दिवस चर्चा सुरू असलेलं टाटा कंपनीचं ऑनलाइन खरेदी आणि विविध सेवा एकत्रित करून तयार करण्यात आलेलं नवं सुपरॲप Tata Neu आजपासून सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे. यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रायोजक असलेल्या टाटाने आयपीएल LSG Vs DC या सामन्यादरम्यानच याची सुरुवात केली आहे. हे ॲप तुम्ही ॲपल ॲप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करू शकता!

या Neu ॲपमध्ये किराणा वस्तु, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, बिल भरणा, रीचार्ज करणे, पैसे पाठवणे, विमान तिकीट बुकिंग, मनोरंजन फॅशन अशा जवळपास सर्व क्षेत्रातील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. UPI पेमेंट्ससाठी Tata Pay ची सुद्धा या निमित्ताने सुरुवात होत आहे! हे ॲप टाटा डिजिटलने डेव्हलप केलं असून आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे. शिवाय खरेदी केल्यावर मोठ्या प्रमाणात रिवॉर्डस सुद्धा मिळणार आहेत आणि तेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख कारण असेल असं टाटा कंपनीला अपेक्षित आहे.

Download Tata Neu on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.tatadigital.tcp

या ॲपमध्ये BigBasket, Croma, IHCL, Qmin, Starbucks, Tata 1mg, Air Asia, Tata CLiq, Tata Play, Westside यांच्या सेवा उपलब्ध आहेत आणि लवकरच Air India, Vistara, Titan, Tanishq, Tata Motors यांच्याही सेवा जोडल्या जाणार आहेत.


या ॲपमुळे टाटाची ॲमेझॉन व फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ कॉमर्स कंपन्यासोबत थेट स्पर्धा असणार आहे! पहिलाच दिवस असल्यामुळे अनेक युजर्स लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे काही जणांना लॉगिन करण्यात अडचण जाणवू शकते…

Exit mobile version