रेडबसच्या redRail या नव्या ॲपद्वारे रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार!

redRail

बस तिकीट्स बुक करण्यासाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या रेडबसने त्यांचं स्वतःचं रेल्वे तिकीट बुकिंग ॲप आणलं असून याचं नाव redRail असं असणार आहे. खरतर ही सेवा रेडबसच्या ॲपमध्येच उपलब्ध होती मात्र आता स्वतंत्र ॲपमध्येही हा पर्याय देण्यात आला आहे.

https://m.redbus.in/redRail

मेकमायट्रीपची मालकी असलेल्या रेडबसने या ॲपद्वारे IRCTC ट्रेन तिकीट आरक्षित करणं आणखी सोपं केलं आहे. हे ॲप कमी इंटरनेट स्पीड असलेल्या ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रकारे काम करेल. शिवाय कमी क्षमतेच्या अँड्रॉइड फोन्सवरसुद्धा याद्वारे बुकिंग सहज करता येईल असं रेडबस तर्फे सांगण्यात आलं आहे.

तिकीट बुकिंग सोबतच ट्रेनची लाईव्ह लोकेशन आणि PNR स्टेट्स तपासणे अशा गोष्टीही यामध्ये करता येतील.

नव्या ॲपनिमित्त त्यांनी खास ऑफरसुद्धा आणली असून ५० रुपयांपर्यंत १०% सूट मिळेल. यासाठी LOVERAIL हा प्रोमोकोड वापरावा लागेल. शिवाय मर्यादित काळासाठी शून्य सर्व्हिस फी आणि पेमेंट गेटवे चार्जसुद्धा शून्य असेल.

Download redRail on Google Play : play.google.com/store/apps/details?id=com.rails.red

Exit mobile version