ॲपलने रशियात उत्पादनांची विक्री थांबवली : ॲप स्टोअर, ॲपल पे, मॅप्सवरही निर्बंध!

Apple Stops Products Russia

सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ॲपलने रशियाच्या आक्रमणाचा निषेध करत त्या देशातील उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार रशियामधील संबंधित भागीदारी असलेल्यांसोबत ऑनलाइन व्यवहार आणि निर्यात थांबवण्यात येत आहे. शिवाय रशियामधील ॲपल पे व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ॲपल मॅप्समधील काही सेवा बंद करण्यात आल्या आहेत जेणेकरून युक्रेनमधील नागरिकांचं संरक्षण होईल.

गेल्या काही दिवसात बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी रशिया संबंधित सेवा आणि माध्यमांवर बंधने घालण्यास सुरुवात केली आहे. मेटा (फेसबुक), टिकटॉक, गूगल, यूट्यूब यांनी तिथल्या वाहिन्यांचे प्रक्षेपण मर्यादित करून त्यांचा कंटेंट recommend करणं थांबवलं आहे.

RT News आणि Sputnik News या सरकार पुरस्कृत वाहिन्यांचे ॲप्स ॲप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत.

सध्या इतर देशांवर थेट परिणाम नसला तरी हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिलं तर मात्र बऱ्याच क्षेत्रांमध्ये दूरगामी परिणाम होतील अशा घटना घडत जातील असं तज्ञांचं म्हणणं आहे. अजूनही बरेच विद्यार्थी, इतर देशांचे नागरिक युक्रेनच्या भूमीत अडकले असून त्यांनी आपापल्या देशांमध्ये परत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ॲपलचे सीईओ टीम कुक यांनीही याबद्दल ट्विटकरून त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

Exit mobile version