ॲपलचा नवा स्वस्त आयफोन SE 5G 2022 सादर : सोबत नवा iPad Air जाहीर!

ॲपलने त्यांच्या स्वस्त फोन्सच्या iPhone SE मालिकेत नवा स्मार्टफोन आणला असून यामध्ये iPhone 13 मध्ये असलेली A15 Bionic चिप देण्यात आली आहे. शिवाय यामध्ये सुधारित कॅमेरा, सुधारित हार्डवेअर देण्यात आलं आहे. यामधील ग्लाससुद्धा आयफोन 13 मध्ये असलेलाच आहे!

या फोनमध्ये 4.7″ Retina HD डिस्प्ले, A15 Bionic प्रोसेसर, IP67 वॉटर रेझिस्टन्स, 12MP कॅमेरा, 4K 60fps Video Recording, 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5, NFC आणि Lightning port देण्यात आलेलं आहे. फिंगरप्रिंटसाठी TouchID चाच जुना पर्याय आहे. Qi wireless charging चा सुद्धा सपोर्ट आहे.

या फोनची भारतातली किंमत ४३,९०० (64GB) अशी असणार आहे. यामध्ये 128GB आणि 256GB चासुद्धा पर्याय उपलब्ध आहे.

याची किंमत फीचर्सच्या तुलनेत नक्कीच खूप जास्त आहे. शिवाय आधीच्या SE मॉडेलपेक्षा थोडी वाढली सुद्धा आहे. मात्र ॲपल युजर्सना छोट्या स्क्रीनचा फास्ट फोन हवा असल्यास त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय ठरणार आहे. शिवाय पहिल्यांदा ॲपलचा फोन घेण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणता येईल.

याच कार्यक्रमात iPhone 13 आणि iPhone 13 Pro साठी नवा हिरवा रंग उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय iPad Air 5th Gen आणि Mac Studio चीही घोषणा करण्यात आली आहे.

iPad Air 2022 मध्ये आता M1 चिप देण्यात आली असून नवा 12MP Center Stage असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत भारतात ५४,९०० रुपये इतकी असणार आहे.

https://youtu.be/I-t2mwrYc6s
Exit mobile version