ट्विटरने काही महिन्यांपूर्वी आपल्या आवडत्या ट्विटर अकाऊंटला टीप देता येईल अशी सोय दिली आहे. यामार्फत देण्यात येणारे पैसे थेट त्या ट्विटर अकाऊंट असलेल्या व्यक्तीकडे जातात.
यासाठी आता Paytm चाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या ट्विटर हँडलला आता तुम्ही UPI, डेबिट, कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे सहज पैसे पाठवू शकता. यासाठी मराठीसह पाच भारतीय भाषांचा सपोर्टसुद्धा दिलेला आहे.
यापूर्वी भारतात RazorPay चा पर्याय उपलब्ध होता त्या मार्फतसुद्धा वरील सर्व प्रकारे पैसे पाठवता येऊ शकतात. मात्र Paytm द्वारे आपण बाहेरील गेटवे न वापरता थेट त्या हँडलच्या स्वतःच्या Paytm नंबर/अकाऊंटवर पैसे देऊ शकाल. यामार्फत ट्विटर कंपनीला कोणतेही पैसे दिले जात नाहीत.
ट्विटर मार्फत अनेकजण अनेकविध विषयांवर माहिती देत असतात, मोजक्या शब्दात व्यक्त होत असतात. काही खास हँडल्समुळे आपल्या माहितीत दैनंदिन भर पडत जाते. शिवाय ट्विटरच्या डिझाईनमुळे आपल्याला कोणत्याही घडामोडीबद्दल इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा लवकर अपडेट्स मिळतात. यामुळेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तांत्रिक कारणांनी बंद पडले तर सगळे ट्विटरवर येऊन व्यक्त होऊ लागतात!
ट्विटर हँडलवर Tips ची सुविधा सुरू करण्यासाठी खालील प्रमाणे सेटिंग्स करा.
- तुमच्या फोनवर स्वतःच्या Profile मध्ये जा.
- आता Edit Profile वर क्लिक करा
- आता सर्वात खाली Tips चा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक करून Allow tips ऑन करा
- खाली तुम्हाला कोणत्या माध्यमाद्वारे पैसे स्वीकारायचे आहेत ते निवडा
- इथे Paytm, Razorpay असे भारतीय पर्याय आहेत. सोबत crypto मधील बिटकॉईन/Ethereum चाही पर्याय आहेच.
- समजा Paytm पर्याय देणार असाल तर तो Paytm नंबर तिथे टाकून सेव्ह करा.
आता तुमच्या प्रोफाइलवर बाजूचं चिन्ह दिसू लागेल ज्यावर क्लिक करून तुमचे फॉलोअर्स टिप्स पाठवू शकतील.
Search terms : what is twitter tips how to enable twitter tips on your account