सॅमसंग Galaxy Tab S8, S8+, S8 Ultra टॅब्लेट्स जाहीर

आज झालेल्या Galaxy Unpacked कार्यक्रमात सॅमसंगने Galaxy S22 फोन्ससोबत Galaxy Tab S8 मालिकासुद्धा सादर केली आहे. यामध्ये Tab S8, Tab S8+ आणि Tab S8 Ultra चा समावेश आहे. या टॅब्लेट्समध्ये सुधारित डिस्प्ले, नवीन अल्ट्रा वाईड फ्रंट कॅमेरा, ऑटो फ्रेमिंग तंत्रज्ञान, Quick Share अशा सुविधा दिलेल्या आहेत. सोबत S Pen चा सपोर्ट आहेच.

सॅमसंग Galaxy Tab S8 मध्ये 11 इंची 2560×1600 रेजोल्यूशन असलेला WQXGA डिस्प्ले मिळतो. Galaxy Tab S8+ मध्ये 12.4 इंची 2800×1752 रेजोल्यूशनचा डिस्प्ले आणि Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6 इंची Super AMOLED WQXGA+ 2960×1848 रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळतो.

तिन्ही टॅब्लेट Android 12 OneUI 4 वर चालतात. Tab S8 व S8+ मध्ये 13MP+6MP Ultrawide कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. S8 Ultra मध्ये 13MP+6MP Ultrawide आणि दोन 12 MP फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत.

तिन्ही टॅब्लेट 8GB+128GB/8GB+256GB अशा दोन पर्यायात उपलब्ध आहेत. S8 मध्ये 8000mAh, S8+ मध्ये 10090mAh आणि S8 Ultra मध्ये 11200mAh बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही टॅब्लेटमध्ये 45W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

यावेळी प्रथमच तुमचा सॅमसंग फोन ड्रॉ करताना रंग निवडण्यासाठी पॅलेट म्हणून वापरता येईल अशी सोय दिली आहे. शिवाय Apple मध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रसिद्ध असलेलं LumaFusion ॲप आता अँड्रॉइडवर Tab S8 वर प्रथम उपलब्ध होत आहे.

या टॅब्लेटची किंमत अनुक्रमे $699.99, $899.99, $1099.99 अशी ठेवण्यात आली आहे. भारतातली किंमत नंतर जाहीर करण्यात येईल.

https://youtu.be/iTXEJQlMjMI
Exit mobile version