टाटा स्कायचं नवं नाव ‘टाटा प्ले’ : ओटीटी कंटेंट उपलब्ध!

गेली अनेक वर्षं लोकप्रिय असलेला टाटा स्काय हा डायरेक्ट टू होम प्लॅटफॉर्म आता नव्या नावाने येत असून त्यांचा हा ब्रॅंड आता २७ जानेवारीपासून ‘टाटा प्ले‘ (Tata Play) म्हणून ओळखला जाईल. यासोबतच त्यांनी आता विविध OTT पॅक्सद्वारे इंटरनेटमार्फत मालिका, चित्रपट पाहता येईल असे पॅक उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलं आहे.

या नव्या OTT पॅक्समध्ये तुम्ही नेहमीचे टीव्ही चॅनल्ससोबत हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ, Zee5 सुद्धा पाहू शकता. टाटा प्लेवर आता Disney+ Hotstar, Prime Video, Zee5, SonyLIV, Voot Select, Voot Kids, eros now, hungama Play, shemaroo me, SUN NXT, DocuBay, Epic ON CuriosityStream यांचा कंटेंट उपलब्ध आहे. शिवाय काल जाहीर केलेल्या माहितीनुसार आता नेटफ्लिक्ससुद्धा यासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नेटफ्लिक्स Tata Play Binge+ या स्मार्ट सेट टॉप बॉक्सवरच उपलब्ध होईल. याची किंमत २४९९ असून यासोबत तुम्हाला दरमहा २९९ पासून सुरू असलेला Binge प्लॅन घ्यावा लागतो जो आपल्याला या OTT ॲप्सना ॲक्सेस देईल.

Tata Play Netflix

https://www.tataplay.com/dth/explore-offerings या लिंकवर यांच्या नव्या पॅक्सबद्दल माहिती मिळेल.

टाटा प्ले ही एक टाटा सन्स आणि वॉल्ट डिज्नी या दोन कंपन्यांच्या भागीदारीत सुरू असलेली कंपनी असून यांच्याकडे 2 कोटी ३० लाख ग्राहक आहेत. टाटाने त्यांच्या फायबर सेवेचं सुद्धा नाव बदललं असून आता त्याचं नाव Tata Play Fiber असं असणार आहे.

Exit mobile version